अंगा-खांद्यावर साप घेऊन योगा करत आहे तरूणी, व्हिडीओ बघूनच फुटेल घाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:20 PM2024-08-31T12:20:09+5:302024-08-31T12:20:59+5:30
Snake Yoga : तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की, यात तरूणी साप हाती घेऊन किंवा अंगावर घेऊन योगा करताना दिसत आहे. याला स्नेक योगा असं म्हणतात.
Snake Yoga : योगाभ्यास करून शरीराला काय काय फायदे मिळतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. योगाने दिवसाची सुरूवात केली तर तुमचा दिवस चांगला जातो आणि तुम्हाला फ्रेश वाटतं. योगासने वेगवेगळ्या प्रकारची असतात. सध्या एका तरूणीचा योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की, यात तरूणी साप हाती घेऊन किंवा अंगावर घेऊन योगा करताना दिसत आहे. याला स्नेक योगा असं म्हणतात.
काय आहे स्नेक योगासन?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरूणी बॉल पायथन सापासोबत स्नेक योगा करताना दिसत आहेत. जेन झांग यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "हे एकमेव ठिकाण आहे जिथे स्नेक योगा केला जातो. जेव्हा मी या योगा केंद्रात गेले तेव्हा मला सापासोबत काही योगासने शिकवण्यात आली. जेन यांनी पुढे सांगितलं की, तुम्ही कोणतंही आसन करा, पण तुमच्या शरीरावर साप असणं गरजेचं आहे. जेनने सांगितलं की, तिने एक अजगर शरीरावर ठेवून योगासन केलं".
व्हिडिओमध्ये जेनने सांगितलं की, या केंद्रात अनेक प्रकारचे साप आहेत. इथे योगा करण्यासाठी येणारे लोक आपल्या आवडीने सापाची निवड करतात. या योगा केंद्रात सगळ्यात आधी एक दगड निवडण्यास सांगितला जातो. जो तिथे स्मृती चिन्हाच्या रूपात ठेवला जातो.
दरम्यान, या केंद्रात दगडानुसार वेगवेगळे साप ठेवलेले आहेत. दगड निवडल्यावर लोक आपल्या आवडीने सापाची निवड करू शकतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ बघून अनेकांनी जेनच्या या साहसाचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, योगाच्या नावावर अशी फसवणूक करणं योग्य नाही. योगामध्ये असं काही नसतं.