बोंबला! छतावरून स्वीमिंग पूलमध्ये उडी घेत होती महिला, पण अचानक झाली गडबड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:06 AM2020-07-08T11:06:47+5:302020-07-08T11:12:30+5:30

एक महिला टेरेसवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी घेताना दिसत आहे. पण उडी घेताना जसा तिने विचार केला असेल तसं काही होत नाही.

Woman's attempted rooftop jump into pool goes badly wrong watch viral video | बोंबला! छतावरून स्वीमिंग पूलमध्ये उडी घेत होती महिला, पण अचानक झाली गडबड अन्...

बोंबला! छतावरून स्वीमिंग पूलमध्ये उडी घेत होती महिला, पण अचानक झाली गडबड अन्...

Next

आयुष्य रोमांचक नक्कीच आहे पण काही वेगळं करण्याच्या नादात हाडं तोडून घेणं कितपत योग्य आहे? सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला टेरेसवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी घेताना दिसत आहे. पण उडी घेताना जसा तिने विचार केला असेल तसं काही होत नाही. म्हणजे ती थेट स्वीमिंग पूलमध्ये पडत नाही तर मधे असलेल्या शेल्टरवर आधी पडते नंतर स्वीमिंग पूलमध्ये पडते. या व्हिडीओला ट्विटरवर आतापर्यंत 90 लाखांपेक्ष अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ @jaahmiiin नावाच्या ट्विटर यूजरने 6 जुलैला शेअर केला होता. याला त्यांनी कॅप्शन दिले होते की, 'हा व्हिडीओ टिकटॉकवरून दोनदा काढला होता. पण हा 4 जुलैचा माझा दिवस होता'. हा व्हिडीओ 78.2 हजार रिट्विट आणि 3 लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

यात तुम्ही बघू शकता की, इमारतीच्या छतावर एक पुरूष आणि एक महिला आहे. दोघेही सोबत स्वीमिंग पूलमध्ये उडी घेतात. पुरूष बरोबर स्वीमिंग पूलमध्ये उडी घेतो, पण महिलेची शेल्टरसोबत टक्कर होते. त्यामुळे ती कोलांडी घेऊन पाण्यात पडते आणि तिथे असलेल्या लोकांमध्ये एकच हशा पिकतो. महिला मात्र तिला लागलं असूनही अंगठा दखवून सगळं काही ठिक असल्याचं दर्शवते. 

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोक पोट धरून हसत आहेत. पण काही लोक महिलेच्या हिंमतीलाही दाद देत आहेत. हवं तसं झालं नसलं तरी महिला एन्जॉय करताना दिसत आहे.

रिकाम्या वेळेत लोकांनी केलेल्या 'या' करामती पाहून व्हाल अवाक्, काहींवर पोट धरून हसाल तर काहींना द्याल दाद!

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

Web Title: Woman's attempted rooftop jump into pool goes badly wrong watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.