वजन कमी होत नाही म्हणून दातच शिवले, महिलेचे अजब कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 02:11 PM2022-11-13T14:11:27+5:302022-11-13T14:12:21+5:30

वजन कमी करण्यासाठी लोक नाही नाही ते उपाय करतात आणि फसतात. विचित्र डाएट करणे तर ट्रेंडच बनला आहे. पण दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने तर हद्दच केली.

women-sealed-her-teeth-to-reduce-weight-took-big-risk-with-her-teeth | वजन कमी होत नाही म्हणून दातच शिवले, महिलेचे अजब कारनामा

वजन कमी होत नाही म्हणून दातच शिवले, महिलेचे अजब कारनामा

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी लोक नाही नाही ते उपाय करतात आणि फसतात. विचित्र डाएट करणे तर ट्रेंडच बनला आहे. पण दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने तर हद्दच केली. खाण्यावर कंट्रोल नाही म्हणून तिने आपले सरळ दातच वरुन खालुन शिवले. ना तोंड उघडले जाईल ना जास्त खाणं होईल वजनही कमी होईल असा विचार तिने केला. फक्त थोडा समोरचा भाग उघडा ठेवला. नक्की काय आहे हे प्रकरण 

जास्त वजनावर उपाय

दक्षिण आफ्रिकेतील या महिलेचे नाव आहे अवाइवे माजोसिवे आहे. ही महिला आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त होती. पण तरी तिचे खाण्यावर नियंत्रण नव्हते. सतत काही ला काही खायची तिची सवय होती. तिने सवय बदलावी म्हणून खूप प्रयत्न केले पण तिला यश आले नाही.

दात शिवण्याचा घेतला निर्णय

अखेर महिलेने दातांवरच नियंत्रण ठेवावे म्हणून दातांना तारा लावल्या. ज्याला स्लिमिंग तारा म्हणतात. या तारा दातात अशा पद्धतीने बांधल्या जातात की ज्यामुळे दातात ब्रॅकेट तयार होते. समोरचा भाग सोडून मागच्या भागावर तिने तारा लावल्या. जेणेकरुन समोरच्या भागांनी काही प्रमाणात खाता येईल. यामुळे महिलेचे वजन १४ किलोंनी कमी झाले. मात्र असे करुन तिने चांगलाच धोका पत्करला आहे.यामुळे महिलेचे दात खराब होण्याचीही शक्यता आहे. तिने केलेला हा प्रकार सधअया सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: women-sealed-her-teeth-to-reduce-weight-took-big-risk-with-her-teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.