ज्या शोरुममधून साडी खरेदी केली, त्याच शोरुमबाहेर ती पेटवली; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:45 PM2022-11-02T12:45:22+5:302022-11-02T12:58:19+5:30

मेरठच्या बेगम पूल जवळील साडीच्या दुकानाबाहेर एका महिलेने काल मंगळवारी चांगलाच हंगामा केला.

women set saree on fire, see why | ज्या शोरुममधून साडी खरेदी केली, त्याच शोरुमबाहेर ती पेटवली; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

ज्या शोरुममधून साडी खरेदी केली, त्याच शोरुमबाहेर ती पेटवली; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

googlenewsNext

एखाद्या गोष्टीत फुकट गेलेले पैसे कसे वसूल करायचे हे एक महिला बरोबर जाणते. त्यातच महिला आणि साडी प्रेम सर्वश्रूत आहे. अशीच एक घटना घडली उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात. मेरठच्या बेगम पूल जवळील साडीच्या दुकानाबाहेर एका महिलेने काल मंगळवारी चांगलाच हंगामा केला. करवा चौथसाठी नेलेली साडी एकदा नेसल्यानंतर फाटली. मग झाले तर साडीचे पैसे परत घेण्यासाठी महिला तावातावाने संबंधित दुकानात पोहचली. दुकानदाराकडे तिने पैसे परत मागितले मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. यावर महिलेने दुकानाबाहेर येत भर रस्त्यावरच साडीला आग लावण्याचा प्रयत्न केला.

रीना शर्मा ही मेरठची रहिवासी असून काही दिवसांपुर्वी तिने उत्सव रास या साडीच्या शोरुममधून ५ हजार रुपयांची साडी खरेदी केली होती. केवळ एकदा वापरल्यानंतर साडी फाटली असा आरोप तिने केला. महिला साडी परत करण्यासाठी दुकानात पोहोचली. दुकानदाराने तिचे काहीच ऐकून न घेतल्याने महिलेने भर रस्त्यातच साडीला आग लावली. या सर्व प्रकाराची सूचना मिळताच पोलिसही तिथे दाखल झाले आणि महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे परत घेतल्याशिवाय जाणार नाही असाच पवित्रा तिने घेतला. महिलेचा एकंदर असा पवित्रा बघून अखेर दुकानदार पैसे देण्यास तयार झाला. मग काय आपले पैसे वसूल करून महिलेने तेथून काढता पाय घेतला.

Web Title: women set saree on fire, see why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.