नवरात्रीत असाही गरबा! एलपीजी गॅसच्या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यासाठी महिलांनी सिलेंडर भोवतीच खेळला गरबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 08:03 PM2021-10-10T20:03:42+5:302021-10-10T20:08:15+5:30

लोक गॅसच्या वाढलेल्या किमतींबाबत आपापल्या पद्धतीने विरोध व्यक्त करत आहेत, तेलंगणातील जमीकुंता गावातल्या महिलांनी एक नवीन मार्ग अवलंबला. इथल्या महिलांनी नवरात्रीला सिलेंडरभोवती गरबा खेळून आपला निषेध व्यक्त केला.

Women in Telangana playing garaba around LPG gas to protest lpg price hike video goes viral | नवरात्रीत असाही गरबा! एलपीजी गॅसच्या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यासाठी महिलांनी सिलेंडर भोवतीच खेळला गरबा

नवरात्रीत असाही गरबा! एलपीजी गॅसच्या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यासाठी महिलांनी सिलेंडर भोवतीच खेळला गरबा

Next

एकीकडे कोरोनामुळे अनेक व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यातच आता महागाईनेही त्यावर ताण आणला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे भाव तर काही कमी व्हायला तयार नाही. एलपीजी पुन्हा महाग झाला आहे. एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याने लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत. म्हणूनच लोक गॅसच्या किमतींबाबत आपापल्या पद्धतीने विरोध व्यक्त करत आहेत, तेलंगणातील जमीकुंता गावातल्या महिलांनी एक नवीन मार्ग अवलंबला. इथल्या महिलांनी नवरात्रीला सिलेंडरभोवती गरबा खेळून आपला निषेध व्यक्त केला.

जमिकुंटाच्या महिलांनी पुन्हा स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिलांनी भरपूर कलशांच्या मधोमध गॅस सिलिंडर ठेवला आणि नंतर त्याभोवती गरबा खेळला. गरबा खेळताना महिलाही गाणी म्हणत होत्या. महिलांचा हा अनोखा निषेध पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आता याच घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एकीकडे वाढती महागाई लोकांच्या जीवनासाठी सापळा बनत आहे. त्याच वेळी, लोक त्यांचे मत सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अनोखे मार्ग वापरत आहेत. म्हणूनच आता महिलांच्या या निषेधाचा व्हिडिओही लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. लोक हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप शेअर करत आहेत.

Web Title: Women in Telangana playing garaba around LPG gas to protest lpg price hike video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.