Women’s Day Special Video: "आसान होता तो हर कोई किसान होता," महिंद्रांच्या जाहिरातीची देशभर चर्चा, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 03:21 PM2021-03-07T15:21:51+5:302021-03-07T15:27:40+5:30
Women's Day Special Video : महिला दिनाच्यानिमित्तानं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच एक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. अलिकडेच त्यांनी महिला दिनाच्या निमित्तानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत महिंद्रा कंपनीची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. महिंद्रा कंपनीच्या जाहिरातीद्वारेमहिलांची कणखर प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महिला दिनाच्यानिमित्तानं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. जाहिरातीची थीम ‘आसान होता तो हर कोई किसान होता!’, अशी ठेवली आहे. (Mahindra Tractors Special Video Ad on the occasion of International Women Day)
महिंद्रा ग्रुपकडून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओची संकल्पना ही ट्रॅक्टरसाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी लागणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्ट अशी ठेवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता शक्ती नावाची तरुणी आणि आरटीओ विभागाचा अधिकारी यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...
आरटीओ अधिकारी तरुणीला ट्रॅक्टरची ड्रायव्हिंग टेस्ट देणं आसान नही होगा, असं म्हणतो. त्यावर शक्ती नावाची तरुणी आसान होता तो हर कोई किसान होता!, असं म्हणते. या व्हिडीओच्या माध्यमातून महिंद्रा ग्रुपकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रती असणारा दृष्टिकोन बदलणं आणि शेतकऱ्यांच्या कार्याला सलाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार!