महिलेचा डान्स पाहून चक्रावलं लोकांचं डोकं, म्हणाले - महिलेच्या अंगात वारं शिरलंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:05 AM2024-06-03T10:05:47+5:302024-06-03T10:23:38+5:30

Viral Video : या महिलेची डान्स करण्याची स्टाईलच वेगळी आहे. महिलेने या व्हिडीओत  "ये जो तेरी पायलों की छम-छम है" गाण्यावर डान्स केला आहे.

Women's funny dance video goes viral on social media | महिलेचा डान्स पाहून चक्रावलं लोकांचं डोकं, म्हणाले - महिलेच्या अंगात वारं शिरलंय...

महिलेचा डान्स पाहून चक्रावलं लोकांचं डोकं, म्हणाले - महिलेच्या अंगात वारं शिरलंय...

Funny Dance Video Viral: आजकाल दिवसरात्र लोक सोशल मीडियाचा वापर करतात. त्यावर व्हायरल होणारे फोटो व्हिडीओ बघत असतात. काही व्हिडीओ तर असे असतात जे पोटधरून हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. डान्सच्या व्हिडीओंनी तर सोशल मीडिया भरलेला आहे. कधी जुन्या तर कधी नवीन गाण्यांवर लोक डान्स करताना दिसतात. तर काही डान्स फनी असतात. सध्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका 90 च्या दशकातील एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

काही लोक सोशल मीडियावर त्यांचे डान्सचे चांगले व्हिडीओ पोस्ट करतात तर काही लोक फनी डान्सचे. या महिलेची डान्स करण्याची स्टाईलच वेगळी आहे. महिलेने या व्हिडीओत  "ये जो तेरी पायलों की छम-छम है" गाण्यावर डान्स केला आहे. महिलेने या गाण्यावर ज्या सेप्स केल्या आणि जसे हावभाव दिले ते बघून कुणीही पोटधरून हसतील. व्हिडीओ बघून लोक महिलेच्या डान्सवर गमतीदार कमेंट्स करत आहेत.

हा गमतीदार डान्स व्हिडीओ @modelingboudi नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला असून व्ह्यूजही भरपूर मिळत आहेत. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत आणि व्हिडीओ शेअरही करत आहेत.

एका यूजरने कमेंट केली की, "महिलेच्या अंगात कोणतं भूत आलंय". तर दुसऱ्याने लिहिलं की, "रावणाची बहीण शूर्पणखाबाबत ऐकलं होतं, आज बघितलं सुद्धा". तिसऱ्याने लिहिलं की, "या महिलेच्या शरीरात फार डेंजर आत्मा शिरली आहे, तेव्हाच इतके झटके मारत आहे". 

Web Title: Women's funny dance video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.