बाबो! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी ७ हजार किमीचा प्रवास, गुगलवर लिहिले Marry Me

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 01:17 PM2019-04-12T13:17:31+5:302019-04-12T13:19:58+5:30

जगातलं जर सर्वात यूनिक मॅरेज प्रपोजल काही असेल तर ते तुम्हाला यात बातमीत वाचायला मिळेल. जपानमधील ही घटना आहे.

Worlds most unique wedding proposal Japanese man travels 7000 km in 6 months goes viral | बाबो! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी ७ हजार किमीचा प्रवास, गुगलवर लिहिले Marry Me

बाबो! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी ७ हजार किमीचा प्रवास, गुगलवर लिहिले Marry Me

Next

जगातलं जर सर्वात यूनिक मॅरेज प्रपोजल काही असेल तर ते तुम्हाला यात बातमीत वाचायला मिळेल. जपानमधील ही घटना आहे. टोकियोचा आर्टिस्ट Yasushi Yassan Takahashi ने इतका प्रवास केला की, त्याने गुगल अर्थवर Marry Me असं लिहिलं.

Takahashi ने त्याच्या गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी ७ हजार किलोमीटरचा प्रवास केला. हा प्रवास करण्यासाठी त्याला सहा महिन्यांचा कालावधी लागला. इतकंच काय तर त्याने यासाठी त्याची नोकरी सुद्धा सोडली. 

Takahashi च्या गर्लफ्रेन्डचं नाव Natsuki असं आहे. तिने मीडियाला सांगितले की, हा तिच्यासाठी सरप्राइज मुव्हमेंट होता. त्यामुळेच हा जगातला सर्वात लग्नासाठीचा प्रपोज आहे. आता मुलाने इतकी मेहनत घेतल्यावर अर्थातच मुलगीही हो म्हणणारंच ना...दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Takahashi चा ट्रॅव्हल व्हिडीओ गुगलने सुद्धा शेअर केला आहे. Takahashi २००८ पासून जीपीएस यूज करण्याचं डिजिटल आर्ट शिकत आहे. त्याने सांगितले की, या टूरआधी तो कधीही टोकिया बाहेर गेला नव्हता. या निमित्ताने त्याने खूपकाही एक्सप्लोर केलं. या प्रवासादरम्यान तो झोपतही कारमध्येच होता. 

Web Title: Worlds most unique wedding proposal Japanese man travels 7000 km in 6 months goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.