गुलाबजामच्या डब्यात किड्यांचे साम्राज्य ; व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:54 PM2023-11-30T16:54:23+5:302023-11-30T16:55:11+5:30
हल्ली सोशल मीडियावर नानाविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Viral video : हल्ली सोशल मीडियावर नानाविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.कधी आपल्या आजुबाजुला घडणारी एखादी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली जाते. तर कधी नेटकऱ्यांची झोप उडवणारे व्हिडीओ देखील समोर येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
तामिळनाडूमधील एका ब्लॉगरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्यक्तीने चेन्नईमधील एका बाजारातून गुलाबजाम खरेदी केले. आपल्या घरी आल्यानंतर त्या व्यक्तीने मिठाईच्या डब्यातून गुलाबजाम बाहेर काढले. पण ते गुलामजाबच्या हवाबंद डब्यात किडे असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. आपल्याप्रमाणे इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी त्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दुकानातून एखादी गोष्ट खरेदीकेल्यानंतर योग्यप्रकारे तपासणे गरजेचे आहे.
गुलाबजामच्या डब्ब्यात सापडलेले किडे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत ३० हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
येथे पाहा व्हिडीओ :