तुम्ही खाणार का 20 लाखांचे आइस्क्रीम? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:05 AM2023-04-10T06:05:40+5:302023-04-10T06:06:11+5:30

मागच्या वर्षी याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

Would you eat 20 lakhs worth of ice cream frozen haute chocolate ice cream | तुम्ही खाणार का 20 लाखांचे आइस्क्रीम? 

तुम्ही खाणार का 20 लाखांचे आइस्क्रीम? 

googlenewsNext

मागच्या वर्षी याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. याचे नाव होते ‘फ्रोजन हाऊते चॉकलेट आइस्क्रीम सुनाडे’. याची किंमत होती फक्त २५ हजार डॉलर्स म्हणजेच २० लाख रुपये. निर्मितीसाठी न्यूयॉर्कच्या यूफोरिया ज्वेलर्सने मदत केली होती. आइस्क्रीमवर २३ कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आला होता. प्लेट १८ कॅरेट सोन्यापासून तयार केली होती. सोन्यापासून केलेल्या चमचावर पांढरा मौल्यवान हिरा लावला होता. 
तयार करण्यासाठी जगातील उत्तम दर्जाच्या आणि महागड्या २८ कोकोजचा वापर करण्यात आला होता. 

चीनमध्ये बनविली पहिली आइस्क्रीम 
- जग जिंकणाऱ्या सिकंदरच्या इतिहासात तसेच बायबलमध्येही याचे उल्लेख आढळतात. चीनमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी जगातील पहिली आइस्क्रीम बनविल्याचा उल्लेख सापडतो. 
- चिनी राजा तांग यांनी पहिल्यांदा दुधापासून बनविलेले आइस्क्रीम खाल्ले होते. भारतीय उपखंडात मुघल शासक हिंदुकुश पर्वतरागांमधून बर्फ मागवत असत. यापासून बनविलेले आइस्क्रीम सरबताप्रमाणे दरबारात पेश केले जात असे.

पाच वर्षांत ५०,८०० कोटींच्या घरात 
एका संशोधनानुसार २०२२ मध्ये भारतात आइस्क्रीमच्या बाजारातील उलाढाल १९,४०० कोटींच्या घरात पोहोचली. पुढच्या पाच वर्षात २०२८ मध्ये हाच बाजार दुपटीपेक्षा अधिक वाढून ५०,८०० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. 

२०२२ मध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या शहरांमध्ये आइस्क्रीम मोठ्या प्रमाणात खाल्ले गेले. 

Web Title: Would you eat 20 lakhs worth of ice cream frozen haute chocolate ice cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.