Video : मूर्ती लहान पण किर्ती महान! 'या' चिमुरड्याचे पुशअप्स पाहून थक्क झाले पैलवान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:56 PM2020-09-03T15:56:33+5:302020-09-03T15:57:45+5:30
व्यायाम न करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा व्हिडीओ आहे.
अनेकजण वर्कआऊट न करण्यासाठी किंवा जिमला न जाण्याची कारणं शोधत असतात. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकजण आळसावलेल्या स्थितीत आहेत. वजन वाढण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्यायाम न करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा व्हिडीओ आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता एक लहान मुलगा पुशअप्स मारताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पैलवान बजरंग पुनिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ २३ सेकंदांचा आहे. एक लहान मुलगा आपली जीन्स वर घेऊन सावरतो त्यानंतर पुश अप्स मारताना तुम्ही पाहू शकता. याचवेळी त्याच्या कुटुंबातील लोक उत्साह वाढवण्यासाठी शाब्बास शाब्बास असं म्हणत आहेत.
प्रैक्टिस शुरू कर दी है आने वाली चैंपियनशिप के लिए 🙏🏽😝😝 pic.twitter.com/pMDGCagtjB
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) September 1, 2020
बजरंग पुनिया यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, येणाऱ्या चॅम्पियनशिपसाठी सरावाला सुरूवात केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५४ हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिले गेलं आहे. जवळपास ७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या लहान मुलाचे कौतुक केले आहे. या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ प्रेरणादायी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
पुशअप्स केल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. मोठ्यांनी कमीत कमी २ ते ५ तास फार जड नसलेल्या एक्सरसाइज कराव्यात. त्यासोबतच आठवड्यातून कमीत कमी २ दिवस मांसपेशींसाठी एक्सरसाइज केली पाहिजे. त्यात पुशअप्स किंवा वेटलिफ्टिंगचा समावेश करावा. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल किंवा मेहनत तुमच्यासाठी फायदेशीरच आहे. याने ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि भीती दूर करण्यासाठीही मदत मिळते.
हे पण वाचा-
वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली
लय भारी! ड्रग पेडलर्सच्या मुसक्या आवळून पोलिसांनी अखेर सांगितलं,.... रसोडे मे कौन था?