२५ रोट्या खाल्ल्या होत्या साहेब! झोपेत पकडलेल्या हेड कॉन्स्टेबलने दिले भन्नाट स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:34 IST2022-10-12T14:31:45+5:302022-10-12T14:34:58+5:30
आपल्याकडे एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने कामात चूक केल्यास लेखी खुलासा घेण्याची पद्धत आहे. पण काही खुलासे वाचण्यासारखे असतात.

२५ रोट्या खाल्ल्या होत्या साहेब! झोपेत पकडलेल्या हेड कॉन्स्टेबलने दिले भन्नाट स्पष्टीकरण
आपल्याकडे एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने कामात चूक केल्यास लेखी खुलासा घेण्याची पद्धत आहे. पण काही खुलासे वाचण्यासारखे असतात. काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याचा रजा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर पोलीस ट्रेनिंग सेंटर मधील एक स्पष्टीकरणाचे पत्र व्हायरल झाले आहे. हे पत्र वाचून नेटकऱ्यांनी पोलीस कॉन्स्टेबलला ट्रोल केले आहे.
सुल्तानपूर येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर मधील पोलीस हेड कॉन्स्टेबल राम शरीफ यादव झोपलेले अधिकाऱ्यांना सापडले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना ही मोठी चूक असल्याचे सुनावले आणि या संदर्भात लेखी स्पष्टीकरण देण्याची सूचना दिली.
सुल्तानपुर में ट्रेनिंग क्लास में सोते हुए पकड़े गए सिपाही से जब स्पष्टीकरण मांगा गया
— Varun SR Goyal (@varunmaddy) October 11, 2022
तो जवाब गजब का था 😆😆😆 pic.twitter.com/qk0kdPOOH9
कॉन्स्टेबल यादव यांनी लेखी स्पष्टीकरण दिले आहे. " मी लखनौमधून ट्रेनिंगसाठी पीटीसी दादपूर येथे बसने आलो. येथे पोहोचेपर्यंत मला खूप त्रास झाला. त्या दिवशी मी व्यवस्थित जेवलो नव्हतो.त्यामुळे मी सकाळी २५ रोट्या, एक थाळी भात एवढ खाले. त्यामुळे मला जास्त झोप आली. मी इथून पुढं एवढं जेवणार नाही, असंही त्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.
हे स्पष्टीकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ट्विटरवर @varunmaddy नावच्या ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करण्यात आले आहे. यात कॅप्शनही दिली आहे. सुल्तानपूर मध्ये ट्रेनिंस सेंटरमध्ये झोपलेल्या कॉन्स्टेबल जवळ स्पष्टीकरण घेतले. ते त्याचे उत्तर भन्नाट होते.''अशी कॅप्शन दिली आहे.