आधी हाणामारी, नंतर डान्स; WWE च्या सुपरस्टार्सना 'नाटू-नाटू'ची भुरळ, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 02:20 PM2023-09-17T14:20:29+5:302023-09-17T14:21:25+5:30

हैदराबादमध्ये WWE चे आयोजन करण्यात आले होते.

wwe-superstars-dance-on-indian-song-rrr-naatu-naatu-in-ring-watch-video | आधी हाणामारी, नंतर डान्स; WWE च्या सुपरस्टार्सना 'नाटू-नाटू'ची भुरळ, पाहा VIDEO

आधी हाणामारी, नंतर डान्स; WWE च्या सुपरस्टार्सना 'नाटू-नाटू'ची भुरळ, पाहा VIDEO

googlenewsNext

WWE in India: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चे भारतात लाखो चाहते आहेत. अलीकडेच हैदराबादमध्ये WWE चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जॉन सीनासह अनेक WWE सुपरस्टार्सनी हजेरी लावली. आपल्या आवडत्या सुपरस्टार्सना पाहण्यासाठी चाहत्यांनीही तुफान गर्दी केली होती. यावेळी एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. WWE मधील पैलवानांनी आधी तुफान हाणामारी केली अन् नंतर RRR चित्रपटातील प्रसिद्द 'नाटू-नाटू' गाण्यावर डान्स केला.

चार WWE पैलवानांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते चौघे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून गाण्याची प्रसिद्ध स्टेप्स करताना दिसत आहेत. WWE च्या रिंगमध्ये नेहमीच अॅक्शन पाहायला मिळते, पण हैदराबादमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. यावेळी ड्रू मॅकेंटायर, जिंदर महल, सॅमी झेन आणि केविन ओवेन्स सारखे सुपरस्टार्स डान्स करताना दिसले. 

नेटकऱ्यांना हा व्हिडिओ इतका आवडला की, व्हिडिओला 6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी व्हिडिओला लाईक देण्यासोबतच कमेंट करुन आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर epicwrestlingmoments नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर एका युजरने कमेंट केली की, 'पूर्वी WWE मध्ये साखळी, खुर्ची, टेबल याने मारहाण पाहायला मिळायची, आता डान्स पाहायला मिळतोय.' 

या महिन्याच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये WWE इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. याची अनेक महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी अनेक रेसलर भारतात आले होते. जवळपास 7 वर्षांनंतर भारतात WWE चे आयोजन झाले. याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. कार्यक्रमाच्या तिकीटांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती.

 

Web Title: wwe-superstars-dance-on-indian-song-rrr-naatu-naatu-in-ring-watch-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.