२५ लाखाच्या कारमधून फिरतो पंक्चर रिपेअर करणाऱ्याचा मुलगा, असं पालटलं नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:47 PM2022-11-28T12:47:13+5:302022-11-28T13:02:02+5:30

यूट्यूबर मनोज डे (Manoj Dey) याची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

yotube video changed life of youtuber manoj dey inspirational story | २५ लाखाच्या कारमधून फिरतो पंक्चर रिपेअर करणाऱ्याचा मुलगा, असं पालटलं नशीब!

२५ लाखाच्या कारमधून फिरतो पंक्चर रिपेअर करणाऱ्याचा मुलगा, असं पालटलं नशीब!

googlenewsNext

नवी दिल्ली-

यूट्यूबर मनोज डे (Manoj Dey) याची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपले वडील एकेकाळी सायकल रिपेअरिंगचं काम करायचे. त्यांची दिवसाची कमाई २५० रुपये इतकी होती. पण आज आपण यूट्यूबर झाल्यानं २५ लाखाच्या गाडीतून फिरत आहोत, असं यूट्यूबर मनोजनं त्याच्या व्हिडिओत सांगितलं आहे. आज मनोजकडे महागडी कार आणि राहण्यासाठी चांगलं घर तो बांधत असल्याचं सांगतो. 

Manoj Dey च्या यूट्यूब चॅनलचे जवळपास ३४ लाख सब्सक्रायबर्स आहेत. तो यूट्यूबमधून दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतो. तर मनोजचे फेसबुकवर जवळपास ४ लाख आणि इन्स्टाग्रामवर जवळपास ४ लाख ८५ हजार फॉलोअर्स आहेत. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील एका छोटाशा गावात मनोजचा जन्म झाला. घरात एकूण ८ सदस्य आहेत. सर्वजण एका छोट्याशा घरात राहत होते. 

मनोजचं प्राथमिक शिक्षण एका सरकारी शाळेत झालं आङे. आयटीआयचा कोर्स केल्यानंतर मनोज गुजरातच्या एका फॅक्ट्रीमध्ये कामाला लागला. पण काही दिवसातच नोकरी सोडून तो घरी परतला. त्यानं घरीच ट्यूशन घेणं सुरू केलं सोबतच जवळच्या एका सायबर कॅफेमध्ये तो काम करू लागला. सायबर कॅफेमध्ये काम करताना मनोजनं सहजच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओच्या थमनेलवर लिहिलं होतं...यूट्यूबमधून पैसे कसे कमावयाचे? मनोजनं व्हिडिओ पाहिला आणि त्यानं यूट्यूबर बनायचं असं ठरवून टाकलं. सुरुवातीच्या काळात मनोजला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. 

मनोजचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानं सुरुवातीला एक सिंगिंग चॅनल सुरू केलं जे अजिबात चाललं नाही. मग त्यानं कॉमेडी चॅनल सुरू केलं. तीही कल्पना काही योग्य ठरली नाही. मग मनोजनं टेक चॅनल सुरू केलं. यात १००-१५० व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मनोजची कमाई सुरू झाली. यानंतर मनोजची कमाई ८० डॉलरपर्यंत पोहोचली. पण एकदा अचनाक त्याचं अॅडसेन्स अकाऊंट बंद झालं. 

यूट्यूबच्या गाइडलाइन्सबद्दल सुरुवातीला काहीच माहिती नव्हती, असं मनोज सांगतो. नियमांचं उल्लंघन झाल्यानं यूट्यूबनं कायमस्वरुपी अॅडसेन्स डिसेबल केल्याचं त्याला कळलं. यामुळे मनोज पुरता कोसळला होता. डिप्रेशनला सामोरं गेला. पण काही महिन्यानंतर त्यानं पुन्हा नवं चॅनल सुरू करण्याचा निर्धार केला. 

मनोजनं यावेळी आपल्या Manoj Dey नावानं यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्यावेळी मनोजकडे अगदी स्वस्तातला स्मार्टफोन होता. त्यावरच तो शूट करत असे. शेजारील घराच्या शिडीवर बसून तो व्हिडिओ रेकॉर्ड करू लागला. यूट्यूबनं जेव्हा मनोजचं चॅनल मॉनिटाइज करणं सुरू केलं तेव्हा त्याचे सबस्क्रायबर्स ३३ हजार इतके होते. त्यावेळी यूट्यूबकडून पहिल्यांदाच मनोजला १४ हजार रुपये मिळाले होते. 

पुढे मनोजचं चॅनल इतकं हिट ठरलं की अगदी रॉकेट स्पीडनं सबस्क्राइबर्स आणि व्ह्यूज वाढले. एका वर्षात मनोजची कमाई लाखांपर्यंत पोहोचली. यूट्यूबच्या कमाईतून आपण २५ लाखांची कार विकत घेतल्याचं मनोज सांगतो. तसंच एक आलिशान प्लॉट विकत घेतला आणि तिथं आता तो त्याच्या स्वप्नातलं घर बांधत आहे. यूट्यूबमुळे आपल्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्याच बदलल्याचं तो सांगतो. 

यूट्यूबमधून कुणीही पैसा कमावू शकतो. फक्त तुमच्याकडे एक स्मार्टफोन हवा, माहिती हवी याजोडीला संयम आणि चिकाटी असेल तर कुणीही कमाई करू शकतो, असं मनोज सांगतो. 

Web Title: yotube video changed life of youtuber manoj dey inspirational story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.