ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी बाईकस्वाराची शक्कल; २ कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:13 PM2021-04-07T14:13:54+5:302021-04-07T14:14:11+5:30
नेहमी आपण पाहतो की, मोठमोठ्या वाहनांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात छोट्या गाड्या मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात
आपल्या देशात कधी काय होईल सांगता येत नाही. अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय. एका वाहतूक कोंडीत अडकलेल्या बाईकस्वाराचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
नेहमी आपण पाहतो की, मोठमोठ्या वाहनांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात छोट्या गाड्या मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु या व्हिडीओत तुम्हाला काही भलतंच दिसेल. या व्यक्तीने ट्रकच्या खालून ट्रॅफिक जाममधून स्वत:ची सुटका करून घेतली. इन्स्टाग्रामवर अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
व्हिडीओत पाहू शकता की, ट्रक उभा आहे. ज्यामुळे छोट्या गाड्या खोळंबल्या आहेत. रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तेव्हा एका व्यक्तीने देशी झुगाड लावून ट्रकच्या खालच्या बाजूने पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. ज्यापद्धतीने त्याने ट्रकच्या खाली गाडी घातली ते लोकांना आवडलं. परंतु हे करणं अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे तुम्ही कुणीही अशाप्रकारचं धाडसी कृत्य करू नका.
हा व्हिडीओ विमल सैनी नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. २६ मार्चला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत २ कोटींहून अधिक लोकांना हा पाहिला आहे. तर ११ लाख लाइक्सदेखील व्हिडीओला मिळाले आहेत. लोकांनी कमेंट्स सेक्शनला गजब रिएक्शन दिल्या आहेत.