बँक खात्यात अचानक आले ६ कोटी, तरुणाने सर्व पैसे केले खर्च, आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:55 PM2022-11-05T15:55:50+5:302022-11-05T16:07:45+5:30
सध्याच युग हे डिजिटल युग. बँक व्यवहारही डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यात फसवणुकीच्याही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ऑनलाईन पैसे पाठवताना चुकून दुसऱ्या खात्यात पैसे गेल्याच्याही अनेक घटना समोर येतात.
सध्याच युग हे डिजिटल युग. बँक (Bank) व्यवहारही डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यात फसवणुकीच्याही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ऑनलाईन पैसे पाठवताना चुकून दुसऱ्या खात्यात पैसे गेल्याच्याही अनेक घटना समोर येतात, आता अशीच एक घटना समोर आली. एका तरुणाच्या बँक खात्यावर अचानक सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे आले, एवढी मोठी रक्कम खात्यावर आल्याचे पाहून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यास सुरूवात केली. पण, हे प्रकरण समोर आल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
एका दाम्पत्याने एक नवे घरे खरेदी केले होते, या घराचा पूर्ण व्यवहारही झाला होता. या घराचे पैसे पाठवण्यासाठी दाम्पत्याने ऑनलाईन ट्रान्झीशन करण्यास सुरुवात केली. पण, त्यांनी टाकलेला खाते नंबर चुकीचा होता, त्यामुळे त्यांनी पाठवलेले पैसे चुकीच्या खात्यावर गेले. म्हणजेच हे सर्व पैसे या तरुणाच्या खात्यावर जमा झाले. ही घटना या दाम्पत्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेत तक्रार केली.
८३ वर्षांची विदेशी नवरी तर २८ वर्षांचा पाकिस्तानी नवरा...एक अनोखी प्रेमकहाणी!
बँकेत तक्रार करेपर्यंत या तरुणाने बँक खाते रिकामे केले होते. त्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांना यावर काहीच करता आले नाही, त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे नाव अद्बेल घडिया असं आहे. हा तरुण ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे राहतो. त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.
दाम्पत्याने चुकून त्या तरुणाच्या खात्यात ६ कोटी १४ लाख रुपये पोठवले होते. हे पैसे आल्याचे कळताच त्या तरुणाने कोणतीही चौकशी केली नाही. वेळ वाया न घालवता त्याने सर्व काढले. यातील काही पैशांचे त्याने सोने खरेदी केले. तर ९० हजारांची त्याने शॉपींग केली. त्याने या पैशातून मोठी पार्टीही केली आणि सर्व पैसे उडवले. आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे.