लहान मुलांना ट्यूशन देणारा तरुण 29व्या वर्षी झाला कोट्याधीश; वार्षिक 11 कोटींची कमाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:40 PM2022-10-12T18:40:48+5:302022-10-12T18:41:37+5:30
डॉक्टर व्हायचे होते, पण कॉलेजने अॅडमिशन नाकारले. लहान मुलांना शिकवले, मॉडलिंगही केली.
आजकाल YouTubeवर व्हिडिओ बनवून लोक लखपती-करोडपती होत आहेत. युट्यूबवर विविध विषयांचे व्हिडिओ उपलब्ध असतात. यात शक्षणाशी संबंधित व्हिडिओचांही समावेश आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवून एक तरुण अवघ्या 29व्या वर्षी कोट्यधीश झाला आहे. कधीकाळी या तरुणाने लहान मुलांना ट्यूशनही दिली आहे.
कधीकाळी गरीब असलेला हा तरुण आज आरामाचे जीवन जगत आहे. एका वर्षात त्याने 11 कोटींहून अधिक कमावल्याचा दावा त्याने केला आहे. चार्ली चँग(Charlie Chang) असे या तरुणाचे नाव आहे. चार्लीला डॉक्टर व्हायचे होते, पण अनेक कॉलेजेसकडून नकाराचा सामना करावा लागला. नंतर त्याने मुलांना ट्यूशन देण्याचे सुरू केले. आता तो यूट्यूबच्या जोरावर करोडो रुपये कमावतोय.
चार्ली त्याच्या व्हिडिओमध्ये लोकांना आर्थिक सल्ले देतो. 2014 मध्ये त्याने कॉलेज सोडले. त्याला डॉक्टर व्हायचे होते, परंतु 15 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांनी त्याला नकार दिला. चार्ली कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील रहिवासी आहे. पाच वर्षे त्याने मुलांना शिकवणी दिली. यानंतर मॉडेलिंग आणि स्वतःचा व्यवसायही केला. परंतु, या सर्व कामातून मिळालेल्या उत्पन्नावर तो समाधानी नव्हता. यानंतर त्याचे लक्ष यूट्यूबकडे गेले.
चार्ली दररोज यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करू लागला. हळूहळू त्याचे व्ह्यूजही वाढू लागले. त्याचे व्हिडिओही खूप व्हायरल झाले. चार्लीने CNBC ला सांगितले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने YouTube Adsense साठी स्वतःची नोंदणी केली. यातून त्याची कमाई सुरू झाली. आता चार्ली चांगली कमाई करत आहे.