रस्त्यावरील पेन विक्रेत्या मुलाला घडवली शॉपिंग मॉलची सफर; चिमुकल्याच्या आनंदापुढे आभाळही वाटेल ठेंगणं! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 12:53 PM2023-12-15T12:53:14+5:302023-12-15T12:54:32+5:30

रस्त्यालगत फुटपाथवर पेन विकणाऱ्या मुलाचा व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिकंली आहेत. 

youngster give expensive shoes and cloths to poor kids whos selling pen on road video goes viral on social media  | रस्त्यावरील पेन विक्रेत्या मुलाला घडवली शॉपिंग मॉलची सफर; चिमुकल्याच्या आनंदापुढे आभाळही वाटेल ठेंगणं! 

रस्त्यावरील पेन विक्रेत्या मुलाला घडवली शॉपिंग मॉलची सफर; चिमुकल्याच्या आनंदापुढे आभाळही वाटेल ठेंगणं! 

Viral Video : सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने रस्त्यावरील मुलांना हॉटेलमध्ये जेवायला नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यातच आता बंगळूरुच्या रस्त्यांवरील एका पेन विक्रेत्या मुलाच्या व्हिडीओने नेटकरी भावूक झाले आहेत. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाने रस्त्यावर पेन विकणाऱ्या लहान मुलाला शॉपिंग मॉलची सफर घडवली. पहिल्यांदाच मॉलमध्ये गेल्याने या मुलाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागडे कपडे, शुज खरेदी करत या तरुणाने लहान मुलाच्या आनंदात भर घातली आहे. शॉपिंग मॉलमध्ये वेगवेगळ्या वस्तु खरेदी केल्याने या मुलाचा चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहणार नाही. केवळ टीचभर पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी करत असलेले कष्ट अनेकांना प्रेरणा देणारे ठरतायत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर  प्रवास करणाऱ्या एका तरुणाची भेट पेन विकणाऱ्या मुलाशी होते. त्यानंतर तो तरुण या मुलाला शॉपिंग मॉलमध्ये नेतो. चांगले कपडे, बुट खरेदी करुन त्याला खाऊ दिले आणि परत या मुलाला त्याच्या घरी सोडले. सध्या हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. शिवाय या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: youngster give expensive shoes and cloths to poor kids whos selling pen on road video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.