खड्ड्यांचा उपयोग करुन बनवली पुदिन्याची चटणी, तीही मिक्सरचा उपयोग न करता, एकदा ट्राय कराच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 04:11 PM2021-09-26T16:11:25+5:302021-09-26T16:40:54+5:30
एक व्यक्ती या खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यांचा वापर करुन पुदिन्याची हिरवी चटणी बनवतो तीही मिक्सरचा वापर न करता. हे पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की हे करुन बघावेसे वाटेल.
जुगाडच्याबाबतीत भारतात जितके रेकॉर्ड करण्यात आले आहेत तितके क्वचितच इतर कोणत्याही देशात झाले असतील. देशाच्या कानाकोपऱ्यात लोक त्यांच्या सोयीनुसार दररोज नवे शोध लावत असतात. ज्यांचे मजेदार व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की हे करुन बघावेसे वाटेल.
आपल्या सर्वांना माहित आहे देशातील रस्त्यांची काय अवस्था आहे. याबद्दल अनेक प्रश्न केले जातात, पण वेळ निघून गेल्यावर हे प्रकरण पुन्हा जैसे थे होऊन जाते. अशातच रस्त्यांशी संबंधित एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती या खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यांचा वापर करुन पुदिन्याची हिरवी चटणी बनवतो तीही मिक्सरचा वापर न करता.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन तरुण स्कूटीजवळ उभे आहेत आणि त्यांच्या हातात भांडे आहे. त्यानंतर तो चटणीसाठी सर्व साहित्य त्यात टाकतो आणि त्यानंतर तो त्याच्या स्कूटीवर बसतो आणि भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यांवरुन गाडी चालवतो. थोडे अंतर गाडी चालवल्यानंतर तो आपली स्कूटर थांबवतो आणि मिक्सरचे भांडे उघडतो आणि त्याने या रस्त्यांच्या मदतीने चटणी कशी बारीक केली हे दाखवतो. सोशल मीडियावर या व्हिडीओला @imacuriosguy नावाच्या युजरने शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे. वापरकर्ते या व्हिडीओवर कमेंट करत आहेत तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
#roads#vadodara@SandeepMallpic.twitter.com/iPKRNXcdjE
— 𝙍𝘼𝙅𝙀𝙎𝙃 𝙋𝘼𝙍𝙄𝙆𝙃 (@imacuriosguy) September 19, 2021
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट केली की, आपल्याकडे किती जबरदस्त लोक आहेत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, भाऊ, तुम्ही हा व्हिडीओ बनवण्यासाठी जेवढं पेट्रोल खर्च केलं आहे त्यात तुम्ही संपूर्ण दिवसभर मिक्सरने चटणी बारीक करु शकता. याव्यतिरिक्तही अनेक वापरकर्त्यांनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
Bhai itni der me jitna petrol ka paisa lagega utne paise me to din bhar grinder chalaya ja sakta hai.
— Rizwan Ahmed (@riz_kanpur) September 20, 2021