उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट; थरकाप उडवणारा Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 09:16 AM2020-10-15T09:16:52+5:302020-10-15T09:20:28+5:30

Mumbai Dangerous Stunts Video : उंच इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

youth doing dangerous stunts from 22nd floor of building in mumbai video | उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट; थरकाप उडवणारा Video तुफान व्हायरल

उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट; थरकाप उडवणारा Video तुफान व्हायरल

googlenewsNext

मुंबई - सोशल मीडियावर सध्या विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच थरकाप उडवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. उंच इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. मुंबईतील कांदिवली भागातील हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेतली असून काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट करणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. 

तरुणाचा जीवघेणा स्टंट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुण मुंबईतील एका उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरील कठड्यावर बसून एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. यानंतर तो तेथील अरुंद ठिकाणी हँडस्टँड करताना दिसला. व्हिडीओमध्ये उंच इमारतीवरून दिसणारा खालचा परिसरही दाखवण्यात आला आहे. तरुणाचा हा व्हिडीओ त्याचे मित्र मोबाईलवर रेकॉर्ड करत होते. यामधील एकजण मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतही आहे.

स्टंट करणाऱ्या या तरुणासोबत हा स्टंट मोबाईलवर रेकॉर्ड करणाऱ्या त्याच्या मित्रांचाही पोलीस शोध घेत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कांदिवली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवी अदाने यांनी ज्या इमारतीवर हा स्टंट करण्यात आला तिची ओळख पटली असल्याची माहिती दिली आहे. जय भारत असं या इमारतीचं नाव असून तरुणांचीही ओळख पटली आहे. मात्र सध्या ते बेपत्ता आहेत. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भरधाव वेगात बाईक चालवायला अनेकांना आवडतं. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत जास्त वेगात बाईक चालवण्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लॉकडाऊनमध्ये काही दिवसांपूर्वी असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र वेगाने बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला हे चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली होती. सुपरबाईकचं वेड असलेल्या एका व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर जवळपास 300 किलोमीटर प्रतितास वेगाने वेगाच्या मर्यादेपेक्षा अधिक वेगात बाईक चालवणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. पोलिसांनी बाईक तर जप्त करून त्याला अटक केली होती. 

Web Title: youth doing dangerous stunts from 22nd floor of building in mumbai video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.