प्रसिद्धीसाठी युवकानं मानेवर 'QR Code' टॅटू काढला; पण नंतर जो काही प्रताप घडला, तो ऐकून...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:59 PM2021-03-06T17:59:57+5:302021-03-06T18:00:30+5:30
इन्स्टाग्रामवर या तरूणाचे तब्बल ५४ लाखांहून अधिक फोलोअर्स आहेत. त्याने त्यांच्या मानेवर हा टॅटू गोंदवून घेतला आहे.
आजच्या जगात प्रसिद्धीसाठी अनेक जण काही अजब उद्योग करत असतात. काम मोठं असो वा अनोखं असो प्रसिद्ध होणं हेच लक्ष्य असतं. याच प्रसिद्धीच्या झोतात अनेकवेळा वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात. इन्स्टावर फोटो टाका, यूट्यूबवर व्हिडीओ बनवा, एकाने तर प्रसिद्धीसाठी स्वत:ची नवीकोरी गाडी जाळली होती. प्रसिद्धीसाठी काय काय करावं लागतं. आता एका तरूणाने प्रसिद्धीसाठी जे काय केलंय ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल.
एका मुलाने शरीरावर बारकोडचा टॅटू काढून घेतलाय, हा टॅटू स्कॅन करून चाहते त्याच्या इन्स्टाग्रामच्या त्याच्या अकाऊंटवर जावं म्हणून त्याने हा प्रताप केलाय. Ladbible च्या वृत्तानुसार, या मुलाचं नाव Mauricio Gomez असं आहे, तो कोलंबियाचा राहणारा आहे, जगभरात त्याला La Liendra नावाने ओळखतात, इन्स्टाग्रामवर या तरूणाचे तब्बल ५४ लाखांहून अधिक फोलोअर्स आहेत. त्याने त्यांच्या मानेवर हा टॅटू गोंदवून घेतला आहे.
परंतु हा टॅटू योग्यरित्या काम करत नाही, म्हणून त्याची माहिती तरूणाने डॉक्टर आणि प्लॅस्टिक सर्जनला दिली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, हा टॅटू बनावट आहे कारण त्याने तुझ्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर जाता येत नाही. हा टॅटू बनवण्यासाठी ३ तासाचा वेळ लागला, पण या टॅटूमुळे त्याच्या अकाऊंटला पोहचल्याची कोणतीही माहिती नाही.