Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! पुरात झोमॅटो बॉयची कमाल, जीव धोक्यात घालून फूड डिलिव्हरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:33 PM2024-08-31T15:33:19+5:302024-08-31T15:38:51+5:30
सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या देशात सर्वत्र पाऊस सुरू आहे. गुजरातसह अनेक भागांना याचा फटका बसला आहे. येथे अहमदाबाद शहर पाण्याखाली गेलं आहे. अशा परिस्थितीत स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक घराबाहेर पडणं टाळत आहेत. आजकाल लोक घरी बसून त्यांना हवे ते ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. पण पूरपरिस्थितीत हे कठीण असू शकतं. सर्व काही असूनही, काही लोक जबाबदारी पेलत जीवनातील अडचणींशी लढत पुढे जाताना दिसतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक भावूक होत आहेत.
सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो गुडघ्यापर्यंत पाण्यातून चालत फूड डिलिव्हरीकरण्यासाठी जात आहे. त्याच्या आजूबाजूच्या गाड्या आणि बस काही प्रमाणात पाण्यात बुडलेल्या दिसतात. सगळलीकडे पाणीच पाणी आहे, पण तरीही तो चालत राहतो.
#ZOMATO delivering in Ahmedabad amidst extremely heavy rains!! #ahmedabadrains#Gujaratpic.twitter.com/JWIvvhIDtP
— Vikunj Shah (@vikunj1) August 26, 2024
विकुंज शाहने ही १६ सेकंदाची क्लिप शेअर केली जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांना डिलिव्हरी मॅनलच्या कमिटमेंट आणि डिटर्मिनेशनसाठी बक्षीस देण्यास सांगितलं आहे. झोमॅटोनेही याला प्रतिसाद दिला आणि डिलिव्हरी एजंटला ओळखण्यासाठी विकुंजला ऑर्डर आयडी देण्यास सांगितले जेणेकरून त्या व्यक्तीला योग्य बक्षीस देता येईल.
गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ भागात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटलं आहे की, चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. येथे पावसाशी संबंधित घटनांनी गुरुवारपर्यंत चार दिवसांत ३२ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातून ३२,००० हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलं असून सुमारे १२०० लोकांची सुटका करण्यात आली आहे.