VIDEO: ५०० रुपये घरभाडे, ५० रुपयांचे जेवण अन्...; फुटबॉलपटू करतोय मुंबईत डिलिव्हरी बॉयचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:44 PM2024-07-24T13:44:28+5:302024-07-24T13:45:49+5:30

मुंबईतल्या झोपडपट्टीत भाड्याने राहणाऱ्या एका फुटबॉलपटूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Zomato delivery boy shows video of himself living in a bathroom sized room in Mumbai | VIDEO: ५०० रुपये घरभाडे, ५० रुपयांचे जेवण अन्...; फुटबॉलपटू करतोय मुंबईत डिलिव्हरी बॉयचे काम

VIDEO: ५०० रुपये घरभाडे, ५० रुपयांचे जेवण अन्...; फुटबॉलपटू करतोय मुंबईत डिलिव्हरी बॉयचे काम

Zomato Boy Viral Video: भारतात असे अनेक लोक आहेत जे आपलं घरं सोडून कुठल्या ना कुठल्या मोठ्या शहरात उदरनिर्वाहाच्या शोधात येतात. यातील अनेकजण हे  मुंबईत येतात पण इथं राहणे सोपे नाही. मुंबईत अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, ज्यात महागडे खोलीचे भाडे, महागडी वाहतूक आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. अशाच एका तरुणाच्या संघर्षाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय मुंबईत आपले जीवन कसे जगत आहे हे दाखवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा झोमॅटो डिलिव्हरी बॉय एक महत्त्वाकांक्षी गायक आणि राज्यस्तरीय फुटबॉल खेळाडू तो आता मुंबईच्या झोपडपट्टीत स्थायिक झाला आहे.

ईशान्य भारतातून आलेल्या प्रंजॉय बोरगोयारी या तरुणाने मुंबईत झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे काम सुरु केले आहे. प्रंजॉयने आपल्या मुंबईतील जगण्याचा संघर्ष सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकही भावूक झाले आहेत. प्रंजॉयने त्याच्या छोट्या खोलीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच तो व्हायरल झाला. या खोलीचे भाडे महिन्याला ५०० रुपये असून इथं राहणे गुदरमारणारे असल्याचे प्रंजॉय म्हणतो. त्याचा हा व्हिडीओ पाहून मदतीचा हात देखील पुढे आला आहे. एका महिलेने त्याला तीन महिन्यांचे भाडे देण्याचा निर्णय घेतला.

व्हिडीओमध्ये प्रंजॉयला त्याच्या खोलीत जाण्यासाठी अरुंद गल्लीतून जावे लागते. मग तो एक पातळ लोखंडी शिडी दाखवतो, जिथून तो वर चढतो आणि त्याच्या खोलीत पोहोचतो. तिथे तो खोलीत असलेल्या एका मुलाची ओळख 'सोनू भैया' म्हणून करून देतो. यानंतर तो त्या छोट्या खोलीची अवस्था दाखवतो. व्हिडिओमध्ये तो ५० रुपयांची बिर्याणी खातानाही दिसत आहे.

 

प्रंजॉयने व्हिडीओमध्ये सांगितले की त्याला काही आरोग्याच्या समस्या आहेत, ज्यामुळे त्याला त्याची कमाई वैद्यकीय उपचारांवर खर्च करावी लागत आहे आणि तो आपल्या कुटुंबाकडे पैसे देखील मागू शकत नाही. त्यामुळे प्रंजॉयला असा संघर्ष करावा लागत आहे. व्हिडिओला इंस्टाग्रामवर ४.४ मिलीयनहून अधिक व्ह्यूज आणि शेकडो कमेंट आल्या आहेत. अनेक इंस्टाग्राम युजर्सनी प्रंजॉयची मेहनत पाहून त्याचे कौतुक केले आहे.

एक्स सोशल मिडिया हँडलवरील खुशी नावाच्या युजरने हे पाहून प्रंजॉयला तीन महिन्यांचे भाडे म्हणून १,५०० दिले. प्रंजॉयने आपल्याकडे मदत मागितली नसून आपण स्वखुशीने हे पैसे देत असल्याचे खुशीने म्हटलं आहे. 

Web Title: Zomato delivery boy shows video of himself living in a bathroom sized room in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.