दिवाळीला रात्री ११ वाजेपर्यंत केलं काम, Zomato डिलिव्हरी बॉयची कमाई ऐकून व्हाल भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:36 PM2024-11-06T13:36:06+5:302024-11-06T13:37:14+5:30

दिवाळीच्या रात्री ६ तास काम केल्यानंतर किती कमाई झाली हे सांगणाऱ्या एका डिलिव्हरी एजंटचा हा व्हिडीओ आहे. जो बघून आणि त्याची कमाई बघून लोक भावूक झाले आहेत.

Zomato delivery boy vlog goes viral tells after works 6 hours on diwali night earns only 317 rupees | दिवाळीला रात्री ११ वाजेपर्यंत केलं काम, Zomato डिलिव्हरी बॉयची कमाई ऐकून व्हाल भावूक!

दिवाळीला रात्री ११ वाजेपर्यंत केलं काम, Zomato डिलिव्हरी बॉयची कमाई ऐकून व्हाल भावूक!

सोशल मीडियावर झोमॅटो डिलिव्हरी एजंटचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ संताप आणणारे तर कधी भावूक करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. दिवाळीच्या रात्री ६ तास काम केल्यानंतर किती कमाई झाली हे सांगणाऱ्या एका डिलिव्हरी एजंटचा हा व्हिडीओ आहे.

झोमॅटोमध्ये पार्ट-टाईम काम करणाऱ्या रितीक तोमरने इन्स्टाग्रामवर सांगितलं की, त्याने दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत काम केलं. त्याने एकूण ८ पार्सल डिलिव्हर केले. त्याने त्याच्या या सहा तासांच्या कामाचा व्लॉग तयार केलाय. जो बघून आणि त्याची कमाई बघून लोक भावूक झाले आहेत.

व्हिडिओनुसार, झोमॅटो एजंटची अंदाजे कमाई फूड डिलिव्हरी अ‍ॅपनुसार, ४० रूपये होती. तो ऑर्डर डिलिव्हर करत होता. रात्री ११ वाजता त्याने त्याचं काम संपवलं. तेव्हा त्याने खुलासा केला की, त्याला ८ ऑर्डर डिलिव्हर केल्या आणि त्यातून त्याने ३१७ रूपये कमावले. शेअर करण्यात आल्यानंतर व्हिडिओला आतापर्यंत ५.५ मिलियन व्ह्यूज आणि शेकडो लाइक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सने दिवाळीच्या दिवशीही मेहनत केल्याचं कौतुक केलं. 

एकाने लिहिलं की, "तुला आणखी बळ मिळो मित्रा, तू तुझी पुढील दिवाली परिवारासोबत साजरी कर". दुसऱ्याने लिहिलं की, "यश तुझी वाट बघत आहे". तिसऱ्याने लिहिलं की, "दिवाळीच्या दिवशी मी बाल्कनीमध्ये उभा होतो आणि आपल्या जीवनाबाबत विचार करत होतो. अचानक एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय सायकलवर शेजारी घरात डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. सगळे उत्सव साजरा करत होते, तर काही केवळ पोट भरण्यासाठी संघर्ष करत होते".

Web Title: Zomato delivery boy vlog goes viral tells after works 6 hours on diwali night earns only 317 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.