जनसुविधा योजनेतून माढ्यातील ३१ गावांसाठी १ कोटी २३ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:52+5:302021-05-24T04:20:52+5:30
माढा : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसुविधा योजनेतून सन २०२०-२१ या वर्षाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व जिल्हा परिषद ...
माढा : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसुविधा योजनेतून सन २०२०-२१ या वर्षाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील विविध ३१ गावांसाठी १ कोटी २२ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली.
या निधीतून हायमास्ट दिवे बसविणे, स्मशानभूमी परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करणे, शिव रस्ते व वस्त्यांकडे जाणारे रस्ते खडीकरण व मजबुतीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, विविध मंदिरांसमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, पुरात वाहून गेलेले विविध गावातील रस्ते करणे, स्मशानभूमी व दफनभूमी बांधणे, त्याभोवती वॉल कंपाऊंड बांधणे अशा विविध कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.
---
बावी, सापटणेसाठी सर्वाधिक निधी
हा निधी मंजूर झालेल्या ३१ गावांमध्ये शिराळ (मा.) ५.५ लाख, वडाचीवाडी (उ. बु) ३ लाख, बावी ७ लाख, रांझणी ५ लाख, भीमानगर ५ लाख, चांदज ७ लाख, वडशिंगे ५ लाख,उंदरगाव २.५ लाख, अंजनगाव उमाटे २.५ लाख, दारफळ सीना २.५ लाख, मानेगाव २.५ लाख, कुंभेज ५.५ लाख, वडाचीवाडी (अं.उ.) २.५ लाख, आढेगाव ५ लाख, परितेवडी ५ लाख, वरवडे ५ लाख, लऊळ ५ लाख, तुळशी २.५ लाख, अकोले खुर्द १.२५ लाख, सापटणे (टें) १० लाख, मिटकलवाडी ५ लाख, घोटी ४ लाख, अकोले बुद्रुक ३ लाख, कापसेवाडी २.५ लाख, महातपूर ३ लाख, सुलतानपूर ३ लाख, लोंढेवाडी ३ लाख, तांदुळवाडी २.५, रिधोरे २.५ लाख, पापनस २.५ लाख, खैरेवाडी २.५ लाख या गावांचा समावेश असल्याचे रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.
---
फोटो - रणजितसिंह शिंदे