तडवळ ते सुलेरजवळगे रस्त्यासाठी १ कोटी २७ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:27 AM2021-09-08T04:27:53+5:302021-09-08T04:27:53+5:30
तडवळ भागातील रस्त्यावर ऊस वाहतूक आणि वाळू वाहतूक सतत होत असते. त्यातच या भागातील अनेक रस्ते हे खराब झाल्याच्या ...
तडवळ भागातील रस्त्यावर ऊस वाहतूक आणि वाळू वाहतूक सतत होत असते. त्यातच या भागातील अनेक रस्ते हे खराब झाल्याच्या तक्रारी आल्याने याची दखल घेत आमदार कल्याणशेट्टी यांनी नैसर्गिक आपत्ती, अर्थसंकल्प, प्रधानमंत्री सडक योजना, जिल्हा नियोजन समिती अशा चारही योजनांतून एकूण १६ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. रस्त्यासाठी १ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वीही या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून २० लाख रुपयांची तरतूद केली होती. हा रस्ता पावसाळा संपल्यानंतर केला जाणार आहे.
अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांसाठी निधीची तरतूद होऊन नवीन डांबरी रस्ते टिकाऊ स्वरूपाचे व्हावेत यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक रस्त्यांना निधी मंजूर झाला आहे, त्यांची सर्व कामे ही पावसाळा संपल्यानंतर सुरू केली जाणार आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची बऱ्याच अंशी रस्त्यांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.