२५/१५ योजनेअंतर्गत १ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:08+5:302021-04-29T04:17:08+5:30

माळशिरस : ग्रामीण दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या २५/१५ योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काही ...

1 crore fund under 25/15 scheme | २५/१५ योजनेअंतर्गत १ कोटींचा निधी

२५/१५ योजनेअंतर्गत १ कोटींचा निधी

googlenewsNext

माळशिरस : ग्रामीण दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या

२५/१५ योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील अनेक रस्ते व विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज होती. त्यामुळे वेळोवेळी आमदार सातपुते यांनी पाठपुरावा करून तालुक्यासाठी विविध गावांमधील अंतर्गत रस्ते खडीकरण, पाण्याची टाकी बांधणे, संरक्षण भिंत बांधणे व सभामंडप बांधणे आदी कामे यातून मार्गी लागणार आहेत.

माळीनगर येथील चारी नं २१ रस्ता ते सुनील एकतपुरे, दसूर येथील अर्जुन सावंत वस्ती रस्ता ते वंदना कागदे रस्ता, कण्हेर येथील महादेव मंदिर ते लक्ष्मीनगर चौक रस्ता, तामशिदवाडी येथील तानाजी नरुटे वस्ती ते नारायण सालगुडे वस्ती रस्ता, संजय दाभाडे वस्ती येथे पाण्याची टाकी, भांबुर्डी येथील मेन कॅनॉल ते सर्जेराव वाघमोडे, पुरंदावडे येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधणे, गोरडवाडी येथील म्हसवड रोड ते भीमराव माने व कोकरे वस्ती रस्ता, मेदड येथील भगवान नारनवर वस्ती येथे रस्ता, खुडूस येथील हांडे वस्ती ८ फाटा ते भवानी माता मंदिर ते पुणे-पंढरपूर रोड, जाधववाडी-कण्हेर रस्ता ते धर्मराज माने वस्ती रस्ता, नातेपुते डॉ. चौधरी घर ते आनंद नगर वसाहत रूपनवर भाऊसाहेब घरापर्यंत रस्ता, खुडूस येथे संत सावता माळी मंदिर बोरकर वस्ती ते महालिंगेश्वर मंदिर रस्ता, मौजे फडतरी-नेटवेवाडी मारुती मंदिर परिसरात सभामंडप बांधणे, पिंपरी बाळूमामा वाडी येथे सभामंडप बांधणे, बचेरी येथे तुळजाभवानी मंदिर येथे सभामंडप बांधणे, पुरंदवडे-पालवेवस्ती चिंचणी मायक्का मंदिर समोर सभामंडप बांधणे आदी कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.

Web Title: 1 crore fund under 25/15 scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.