विधानसभेसाठी ६५५० ईव्हीएम मशीन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:47 PM2019-08-20T12:47:42+5:302019-08-20T12:51:25+5:30

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक पूर्वतयारी; ३५६३ मतदान केंद्रे: ३०० मशीन राखीव ठेवणार

1 EVM machine is filed for assembly | विधानसभेसाठी ६५५० ईव्हीएम मशीन दाखल

विधानसभेसाठी ६५५० ईव्हीएम मशीन दाखल

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीमतदान केंद्राचा विचार करून निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची मागणी केली होतीअकरा मतदार संघात ३५६३ मतदान केंद्रे असून, त्यासाठी ६५५० इतके ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) लागणार

सोलापूर : विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात येत असून, अकरा मतदार संघात ३५६३ मतदान केंद्रे असून, त्यासाठी ६५५० इतके ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) लागणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
 
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्रात कुठल्याच प्रकारची वाढ झालेली नाही. मतदान केंद्राचा विचार करून निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची मागणी केली होती. त्याप्रमाणे आयोगाने तामिळनाडू येथून मशीन पुरविले आहेत. रामवाडी गोदामात मशीनची व्यवस्था केली आहे. आलेले मशीन (बॅलेट युनिट): ६५५०, मतदान केंद्रावर लागणारे मशीन: ६२५०, राखीव: ३००, बॅटरी बॅकअप (कंट्रोल युनिट): ४७१०, राखीव: २२०, व्हीव्हीपॅट: ५०९०, राखीव: २६०.

विधानसभा मतदार संघनिहाय असलेले मतदान केंद्र व लागणाºया मशीनची संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा: केंद्र: ३३४ (मशीन: ५९०), माढा: ३४३ (६००), बार्शी: ३२६ (५७०), मोहोळ: ३३१ (५८०), सोलापूर शहर उत्तर: २७९ (४९०), सोलापूर शहर मध्य: ३०३ (५३०), अक्कलकोट: ३५९ (६३०), सोलापूर दक्षिण : ३२३ (५७०), पंढरपूर: ३३१ (५८०), सांगोला: २९६ (५२०), माळशिरस: ३३८ (५९०). यात शहरी विभागात ११३४ व ग्रामीण भागात २४२९ इतकी मतदान केंद्रे आहेत. या मशीनची तपासणी सुरू झाली आहे. 

Web Title: 1 EVM machine is filed for assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.