१ लाख ६० हजार शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत धान्य योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:54+5:302021-04-28T04:23:54+5:30
मात्र या निर्बंधानंतरही दररोज रुग्णसंख्या वाढीचा दर कायम होता. अशातच आरोग्य सुविधांवर ताण वाढत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, सर्व प्रकारच्या ...
मात्र या निर्बंधानंतरही दररोज रुग्णसंख्या वाढीचा दर कायम होता. अशातच आरोग्य सुविधांवर ताण वाढत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, सर्व प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, बेड उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत होती. त्यामुळे १६ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे उद्योग, व्यवसाय, रोजगार बंद राहणार असल्याने त्यांच्यावर उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेत नागरिकांना दिलासा म्हणून राज्य सरकारने ३ किलो गहू, २ किलो तांदूळ, एक किलो डाळ प्रतिव्यक्ती मोफत देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करण्याअगोदर एप्रिल महिन्याचे धान्य १५ एप्रिल अगोदर वाटप करण्यात आले असल्याने मोफत धान्य योजनेचे वितरण १ मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोट :::::::::::::::
मोफत धान्य योजनेचे धान्य आम्हाला उपलब्ध झाले आहे. त्यानुसार ते धान्य पंढरपूर तालुक्यातील ४६ रास्तभाव दुकानदारांना देण्यात आले आहे. तालुक्यातील जवळपास १ लाख ६० हजार शिधापत्रिकाधारकांना त्याचे वितरण १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. या महिन्याचे धान्य यापूर्वीच वाटप केल्याने मोफत योजनेचे धान्य उशिरा वाटप करण्यात आले. कुणाला धान्य न मिळाल्यास पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
- महेश जाधव
पुरवठा निरीक्षक, पंढरपूर