सोलापूर शहरातील १० फौजदार बनले पुन्हा सहा. फौजदार, पोलीस आयुक्तांचा आदेश: दोन महिन्याच्या पदोन्नतीचा वर्षभर उपभोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:32 PM2017-11-09T15:32:46+5:302017-11-09T15:33:50+5:30
पोलीस आयुक्तालयात कामाच्या नियोजनासाठी दोन महिन्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकरांनी नियुक्त केलेल्या १० सहा. फौजदारांना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पदावनत करण्याचा आदेश दिला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : पोलीस आयुक्तालयात कामाच्या नियोजनासाठी दोन महिन्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकरांनी नियुक्त केलेल्या १० सहा. फौजदारांना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पदावनत करण्याचा आदेश दिला. पदोन्नती मिळालेल्या या अधिकाºयांना जवळपास वर्षभर फौजदार पदाचा उपभोग घेता आला.
मुंबई पोलीस नियमावली भाग: ३ मधील तरतुदीनुसार पोलीस आयुक्तालयात रिक्त असलेल्या फौजदार पदावर सेवा ज्येष्ठतेवर असलेले सहायक फौजदार व हवालदारांना नियुक्ती देण्यास मुभा आहे. पोलीस आयुक्तालयाकडे फौजदारांची ४६ पदे मंजूर आहेत. यातील पदे रिक्त असल्याने यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांनी वरील तरतुदीचा आधार घेत १० सहायक फौजदारांना दोन महिन्यांसाठी फौजदार पदावर बढती दिली होती. दोन महिन्याचा कालावधीनंतरही ते पदोन्नतीवर कार्यरत होते. पण शासनाने फौजदारांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त एम. बी. तांबडे यांनी बढती दिलेल्या या कर्मचाºयांना पदावनत करण्यात येत असल्याचे २७ आॅक्टोबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये एस. डी. होमकर (सदर बझार), ए. एन. लंकेश्वर (विजापूर नाका), शंकर राठोड (फौजदार चावडी), संजय खरात (एमआयडीसी), विष्णू माने (जोडभावीपेठ), एस. एन. आबादीराजे (जेलरोड), आर. एम. कुलकर्णी (सलगरवस्ती), इलाही सय्यद (सदर बझार), सुहास आखाडे (सदर बझार), कमलाकर माने (गुन्हे शाखा), आयुक्त तांबडे यांच्या आदेशान्वये या कर्मचाºयांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या जागी पाठविण्यात आले आहे.