सोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:23 AM2021-05-18T08:23:00+5:302021-05-18T08:24:21+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : सोलापूर शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरूनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सुमारे दोन हजारच्या संख्येमध्ये रुग्ण वाढत आहेत तसेच सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे शहरात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर हद्द वगळून ग्रामीण भागात शुक्रवार दिनांक 21 मे सकाळी 7 पासून ते ते १ जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत 10 दिवसांचा कडक लॉक डाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळामध्ये सर्व किराणा दुकाने भाजीपाला विक्री फळे विक्री हे बंद राहणार आहे मात्र किराणा वस्तू भाजीपाला घरपोच देण्याची मुभा देण्यात आली आहे. काय राहणार बंद अन् काय सुरू राहणार याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.