आयआयटीसाठी सोलापूरचे १० विद्यार्थी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:05 PM2018-06-11T12:05:30+5:302018-06-11T12:05:30+5:30

बाकलीवालचे सात, ए. डी. जोशी कॉलेजचे दोन तर वालचंद कॉलेजचा एक जणांचा समावेश

10 students of Solapur eligible for IIT | आयआयटीसाठी सोलापूरचे १० विद्यार्थी पात्र

आयआयटीसाठी सोलापूरचे १० विद्यार्थी पात्र

googlenewsNext
ठळक मुद्देहर्षवर्धन गांधी याने ८८४ वा रँक तर रोहित कौलगुड याने १७१९ वा रँक पटकावला़बाकलीवाल ट्युटोरियल्सचे सात विद्यार्थी या  परीक्षेसाठी पात्र

सोलापूर :  अखिल भारतीय स्तरावर अभियांत्रिकी प्रवेशपूर्वसाठी घेण्यात आलेल्या २०१८ जेईई मेन अ‍ॅडव्हान्सड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून,  या प्रवेशासाठी सोलापूरमधून १० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सोलापुरातील नामवंत अशा ए. डी. जोशी  ज्युनियर कॉलेजचे दोन  तर वालचंद कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचा यामध्ये समावेश आहे.  या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाºया  बाकलीवाल ट्युटोरियल्सचे सात विद्यार्थी या  परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

जुळे सोलापूरमधील ए. डी. जोशी ज्युनियर कॉलेजमधील तन्मय गायकवाड याने ३०३ वा रँक तर ऋतुजा वटकर याने १९०६ वा रँक पटकावला़ हे दोन्ही विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  ए़ डी़जोशी यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला़ सचिव अमोल जोशी, सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले़ 

वालचंद कॉलेज आॅफ आर्ट्स अँड सायन्सचा जेईई - अ‍ॅडव्हान्सड नीट स्कॉलर बॅचचा विद्यार्थी साईश्रवण आऱ कोथूर याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित (पी़सी़एम़) या ग्रुपमध्ये १६५ गुण मिळवून ४२७० वा रँक प्राप्त केला आहे़ 
वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ़ रणजित गांधी यांनी साईश्रवण याचे कौतुक केले़ यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पराग शहा, उपप्राचार्य संजय शहा, डॉ़ प्रा़ के़ आऱ राव, प्रा़ डॉ़ नितीन ग्रामोपाध्ये, प्रा़ देवेंद्र दरेगोल, समन्वयिका सारिका महिंद्रकर आदी उपस्थित होते़ 

बाकलीवाल ट्युटोरियलचे सात विद्यार्थी रँकमध्ये

  • - नीट-जेईई मेन अ‍ॅडव्हान्स परीक्षेत बाकलीवाल ट्युटोरियलचे सात विद्यार्थी रँकमध्ये उत्तीर्ण झाले़ या परीक्षेत प्रणव पागे याने २७५ वा क्रमांक पटकावला़ सेंटर हेड भारती शहा यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला़
  •  हर्षवर्धन गांधी याने ८८४ वा रँक तर रोहित कौलगुड याने १७१९ वा रँक पटकावला़ याबरोबरच गौरव जोशी ४१६५ वा रँक, सुमित शिंदे याने १९०१ वा रँक, अथर्व माशाळकर याने ६३८३ वा रँक तर विक्रांत पाटील याने ७०२४ वा रँक पटकावला़ 
  • यंदा बाकलीवाल ट्युटोरियलचे हे चौथे वर्ष आहे़ योगेश कबीर, अभिषेक सिन्हा, संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले़ सेंटरप्रमुख भारती शहा, विमल महादेव तांबडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला

अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा 

  •  विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अखिल भारतीय पातळीवर  गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना पात्र ठरवले जाते. या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी  सोलापुरात केवळ चार केंद्रे आहेत.  अतिशय अवघड अशी परीक्षा असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुध्दीचा कस पणाला लागला जातो. 

Web Title: 10 students of Solapur eligible for IIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.