कळमण केंद्रात १०० बेडचे कोरोना सेंटर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:56+5:302021-05-20T04:23:56+5:30

कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार यशवंत माने यांच्या स्थानिक विकास निधीतून नॉन ऑक्सिजन ...

100-bed Corona Center operational at Kalman Center | कळमण केंद्रात १०० बेडचे कोरोना सेंटर कार्यान्वित

कळमण केंद्रात १०० बेडचे कोरोना सेंटर कार्यान्वित

Next

कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार यशवंत माने यांच्या स्थानिक विकास निधीतून नॉन ऑक्सिजन व २० ऑक्सिजन अशी १०० बेडचे कोविड केअर सेंटर कोराेना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आले. या कोविड सेंटरचे उद्घाटन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम साठे व आमदार यशवंत माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी आमदार राजन पाटील, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सरपंच जितेंद्र बाबा साठे, सभापती रजनीताई भडकुंबे, उपसभापती जितेंद्र शीलवंत, गटविकास अधिकारी डॉ. जास्मीन शेख, तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, बालाजी पवार, हरिभाऊ घाडगे, बापू साठे, सरपंच भाऊसाहेब लामकाने, वैद्यकीय अधीक्षक डॉ घोरपडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुलकर्णी, सरपंच पांडुरंग लंबे, उपसरपंच सुनील पाटील,भुजंग लंबे, अजित पाटील, डाॅ. बारसोळे उपस्थित होते.

--

फोटो : १९ कळमण

कळमण प्राथमिक आरोग्य केंद्रातील शंभर बेडचे उद्घाटन करताना आमदार यशवंत माने, बळीराम साठे, रजनीताई भडकुंबे, जितेंद्र साठे, जितेंद्र शीलवंत, प्रल्हाद काशीद

Web Title: 100-bed Corona Center operational at Kalman Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.