अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटी देण्याची नगर विकासमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:53+5:302021-01-18T04:20:53+5:30

अक्कलकोट : तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर कोटी निधी देऊ, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिदें यांनी दिली. सोलापूर येथे ...

100 crore for development of Akkalkot shrine | अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटी देण्याची नगर विकासमंत्र्यांची ग्वाही

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटी देण्याची नगर विकासमंत्र्यांची ग्वाही

Next

अक्कलकोट : तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर कोटी निधी देऊ, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिदें यांनी दिली.

सोलापूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी लागणा-या निधीसाठी प्रस्थाव दिले. यावेळी शंभर कोटी निधी देण्याचे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले.

या भेटीपूर्वी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सर्व तालुकाप्रमुखांना स्वत:च्या तालुक्याच्या विकासासाठी निधी मागणीचे निवेदन देण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार तालुकाप्रमुख देशमुख यांनी अक्कलकोट तीर्थविकासासाठी शंभर कोटीची मागणी केली. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून येतात. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच १०० कोटी रुपयांचा निधी तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर करू अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

शहरातील पालखी मार्गाचे रुंदीकरण व सुशोभीकरण, पंढरपूरप्रमाणे भक्तांच्या निवासासाठी भक्तनिवास, अत्याधुनिक पध्दतीचे संस्कृतीत भवन, अक्कलकोट शहरासाठी रोज पाणीपुरवठा करण्यासाठी हिळ्ळी येथून दुहेरी पाईपलाईन, बायपास रोड जवळील मीनाताई ठाकरे उद्यानाचे सुशोभीकरण, व्यापारी संकूल बाधंणे, एमएसईबी चौक ते मंदिर पर्यंत विद्युतीकरण , एवन चौक ते शिवपुरी(यज्ञनगर) पर्यंत विद्युतीकरण व सुशोभीकरण, स्व,बाळासाहेब ठाकरे चौक येथील तारामाता उद्यान सुशोभीकरण, एस टी बस स्टॅड अत्याधुनिक व सुशोभीकरण अशी कामे सुचवली आहेत.

याप्रसंगी शिवपुत्र बिराजदार, सोपन निकते शहरप्रमुख योगेश पवार, उपप्रमुख प्रवीण घाटगे, प्रा.सूर्यकांत कडबगावकर, आनंद बुककानुरे, सैपन पटेल, विनोद मदने, संतोष गद्दी, प्रसिद्धीप्रमुख बसवराज बिराजदार, खंडु कलाल उपस्थित होते.

---

फोटो : १७ अक्कलकोट ३

नगसरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सत्कार करताना संजय देशमुख, कांतू कडबगावकर, योगेश पवार, सोपन निकते

Web Title: 100 crore for development of Akkalkot shrine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.