१०० वर्षांच्या आजोबांनी केले कोरोनाला चितपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:24 AM2021-05-20T04:24:07+5:302021-05-20T04:24:07+5:30

कोरोना महामारीमुळे गावोगावी मृत्यूचे थैमान सुरू असतानाच घुले आजोबांनी असाध्य आजारावर सहज मात करत नवा आत्मविश्वास दिला आहे. मी ...

The 100-year-old grandfather made Corona happy | १०० वर्षांच्या आजोबांनी केले कोरोनाला चितपट

१०० वर्षांच्या आजोबांनी केले कोरोनाला चितपट

Next

कोरोना महामारीमुळे गावोगावी मृत्यूचे थैमान सुरू असतानाच घुले आजोबांनी असाध्य आजारावर सहज मात करत नवा आत्मविश्वास दिला आहे. मी आजवर अनेक साथीत लोकांचे मृत्यू पाहिले आहेत. त्यामुळे मला काहीही होणार नाही. आत्मविश्‍वासाची खूणगाठ होती. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाही त्यांनी आत्मविश्वास ढळू दिला नाही. अखेर त्यांनी या आजाराला चितपट करीत यश मिळविल्यामुळे घुलेनगर पंचक्रोशीत कुटुंबासह नातेवाईकांनीही आनंद साजरा केला.

अन् ठणठणीत झाले

जन्मताच प्लेगची साथ सुरु असल्याने आई, वडील गेले. मावशीने सांभाळ केला. २५ वर्ष कुस्तीचा नाद जोपासला. गजीढोल, झांज वादनाचा छंद आजही जोपासणाऱ्या घुले आजोबांच्या ठणठणीत तब्येतीतही ३० एप्रिलच्या तपासणीत कोरोनाने गाठलं. मात्र मी आयुष्यात अनेक रोगांच्या साथी बघितल्यात, मला काहीच होणार नाही, असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या आजोबांंना मुलं व नातवांनी दवाखान्यात हलवलं. अनेक दवाखाने पालथे घातल्यानंतर बारामतीला बेड मिळाला. १६ दिवसाच्या उपचारानंतर ठणठणीत होऊन आजोबा चालत घरी पोहोचले.

फोटो ::::::::::::::::::::

कोरोनावर मात करून घरी आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी औक्षण केले.

Web Title: The 100-year-old grandfather made Corona happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.