तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १ हजार बेडचे हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:01+5:302021-06-19T04:16:01+5:30
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सदस्यांची मासिक बैठक पार पडली. यावेळी जि. प. सदस्य रणजितसिह ...
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सदस्यांची मासिक बैठक पार पडली. यावेळी जि. प. सदस्य रणजितसिह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, माजी उपसभापती बंडूनाना ढवळे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी जि. प. सदस्य रणजितसिह शिंदे यांनी येथील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत येथील तालुका आरोग्य यंत्रणेने उत्कृष्ट काम केल्याने कौतुकही करण्यात आले. त्याचबरोबर येथील कृषी अधिकाऱ्यांनी नुसते कृषी दुकाने तपासत आर्थिक व्यवहार करू नयेत, आपल्या मूळ कामे करा अशा सूचना देत इतरही विभागाच्या विषयांवर आढावा घेण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, उपअभियंता एस. जे. नाईकवाडी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पाटील,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, बालविकास प्रकल्प अधिकारी सूर्यवंशी, सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल, कृषी अधिकारी संभाजी पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रमेश बोराडे आदी अधिकारी उपस्थित होते.
----