मोहोळमध्ये तब्बल १०७६ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:23 AM2020-12-31T04:23:05+5:302020-12-31T04:23:05+5:30
मोहोळ तालुक्यातील १०४ गावांसाठी ९४ ग्रामपंचायती असून, यापैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक लागली आहे. यामध्ये तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ...
मोहोळ तालुक्यातील १०४ गावांसाठी ९४ ग्रामपंचायती असून, यापैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक लागली आहे. यामध्ये तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या नरखेड, पेनूर, शेतफळ, अनगर, लांबोटी, कुरुल, पाटकूल, बेगमपूर, टाकळी सि, सावळेश्वर, अनकोळी या प्रमुख गावांचा समावेश असल्याने रंगत वाढली आहे. दरम्यान, बुधवारी, दि.३० डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटच्या तब्बल १०७६ एवढे विक्रमी अर्ज प्राप्त झाले.
शिंगोली/तरटगाव- २५, कामती खुर्द- ३९ , हराळवाडी- २८, ढोकबाभूळगाव-२७ , शिरापूर मो-७ , दादपूर- १७, जामगाव बु- २८ , नांदगाव-९ , रामहिंगणी- १९, विरवडे बु-४१ , परमेशवर पिंपरी- २०, कोरवली- ३७ , पिरटाकळी- १०, तांबोळे- २१, कुरुल- ६६ , नजिक पिंपरी-३८ , सय्यद वरवडे- ४४, कातेवाडी- २६ , शेजबाभुळगाव- ३६, आढेगाव- १३ , सौंदणे-३३ , टाकळी सिकंदर- ६०, वरकुटे- २६, बोपले- १७ , मनगोळी/भैरववडी- ११, यल्लमवाडी- १८ , मसले चौधरी- २९ , नरखेड- ४४ , एकुरके- २०, देगाव वा- ३७, वाळूज- ३९ , खंडाळी- ६२, पापरी- ४६ , पेनूर- ७५ , खवणी- १५ , पाटकूल-४४ , पोखरापूर- ५२ , नालबंदवाडी- ७ , वडवळ- १५ , अनगर/कोंबडवाडी- १७, कुरणवाडी (अनगर)- ९, खंडोबाची वाडी- ९, बिटले- ९, गलंदवाडी/पासलेवाडी- ९, घाटणे- २३ , कोळेगाव- ३८, वाघोली/वाडी- १४ , येणकी- २२, वटवटे-८ , मिरी- २३, कोथाळे- १९ , इंचगाव- २९, घोडेश्वर- ५५, अंकोली-२९ , औंढी- ४० , आष्टी-४९ , देवडी-५१ , येवती- ४७ , तेलंगवाडी- १६ , चिखली-१८ , शेटफळ- ५४, सिद्धेवाडी- ९ , वडाचीवाडी- २८, हिवरे- २४, भांबेवाडी- १०, आष्टे- २४, लांबोटी-२५ , चिंचोली काटी-४३ , विरवडे खु- १५, सावळेश्वर- ५१ , हिंगणी (नि)-२२ , भोयरे- ३९, शिरापूर सो-२३ , अर्जुनसोंड-३१ , मुंढेवाडी- १७, पोफळी- २०,
चौकट-
या निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवारी पेनूर येथे १७ जागेसाठी तब्बल ७५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर त्या खालोखाल कुरुल येथे १७ जागेसाठी ६६, शेटफळ १३साठी ५४, टाकळी १५साठी ६०, खंडाळी १३साठी ६२, पापरी ११साठी ४६, बेगमपूर १३साठी ५५, आष्टी १५साठी ४९, देवडी ११साठी ५१, पोखरापूर १३साठी ५२ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, महसूल सहायक एल. एन. शेख, महेश कोटीवाले यांनी चोख व्यवस्था केली होती.