सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, मुलींनीच मारली बाजी
By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 2, 2023 04:04 PM2023-06-02T16:04:35+5:302023-06-02T16:05:52+5:30
एकूण ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून यापैकी ६० हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सोलापूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी, दुपारी दहावीचा निकाल जाहीर केला असून सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६. ६% इतका लागला आहे. एकूण ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून यापैकी ६० हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
२ ते २५ मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या आहेत. ३४ हजार ३३ मुलांनी तसेच २८ हजार ७६९ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी ३२ हजार २०९ मुले आणि २८ हजार ११९ मुली यात उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९४.६४ टक्के इतकी असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९७.६४ टक्के इतकी आहे.
माधुरी माने हिला ९७ टक्के तर येथील लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल मधील विद्यार्थिनी पियुशा सातपुते हिने सर्वाधिक ९६ टक्के गुण मिळविले आहे.