दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्का 10.84 टक्क्यांनी घसरला

By appasaheb.patil | Published: June 8, 2019 02:28 PM2019-06-08T14:28:58+5:302019-06-08T14:42:57+5:30

सर्वात कमी निकाल अक्कलकोट तालुक्याचा; जिल्ह्यातील ५२ हजार ५९६ विद्यार्थी उत्तीर्ण

In the 10th standard, Solapur's percentage dropped by 9 per cent | दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्का 10.84 टक्क्यांनी घसरला

दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्का 10.84 टक्क्यांनी घसरला

Next
ठळक मुद्देमार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता जाहीर झालासोलापूर जिल्ह्याचा एकूण ८१.४३ टक्के निकाल लागला असून गतवषीर्पेक्षा यंदा दहावीच्या निकालात ९ टक्क्यांची घसरण झाली

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्याचा एकूण ८१.४३ टक्के निकाल लागला असून गतवषीर्पेक्षा यंदा दहावीच्या निकालात 10.84 टक्क्यांची घसरण झाली आहे.  यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. 

इयत्ता दहावीसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण ६४ हजार ५९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५२ हजार ५९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३५ हजार ६२५ मुलांपैकी २७ हजार ८२ मुले उत्तीर्ण झाली. मुलांची टक्केवारी ७६.०२ टक्के आहे. जिल्ह्यातून २८ हजार ९६९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी २५ हजार ५१४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८८.०७ टक्के असून मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी अधिक आहे.
------
तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे

  • - अक्कलकोट : ७३.०९ टक्के
  • - बार्शी : ८५.५१ टक्के
  • - करमाळा : ७८.०६ टक्के
  • - माढा : ८४.१५ टक्के
  • - माळशिरस : ७८.९१ टक्के
  • - मंगळवेढा : ८४.५१ टक्के
  • - मोहोळ : ८६.४५ टक्के
  • - पंढरपूर : ८१.५२ टक्के
  • - सोलापूर शहर : ८१.७३ टक्के
  • - सांगोला - ८४.७९ टक्के
  • - एकूण निकाल - ८१.८३ टक्के

Web Title: In the 10th standard, Solapur's percentage dropped by 9 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.