कत्तलीसाठी घेऊन निघालेली ११ जनावरे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:35 AM2020-12-14T04:35:12+5:302020-12-14T04:35:12+5:30

वैराग : बार्शीहून उस्मानाबादला कत्तलीसाठी घेऊन निघालेली ११ जनावरे आणि टेम्पो वैराग पोलिसांनी पकडून साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला. ...

11 animals taken for slaughter were caught | कत्तलीसाठी घेऊन निघालेली ११ जनावरे पकडली

कत्तलीसाठी घेऊन निघालेली ११ जनावरे पकडली

Next

वैराग : बार्शीहून उस्मानाबादला कत्तलीसाठी घेऊन निघालेली ११ जनावरे आणि टेम्पो वैराग पोलिसांनी पकडून साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला.

गौडगाव येथे नागोबा चौकात शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. एका टेम्पोमधून गायी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित घाडगे व चार होमगार्ड यांच्या पथकाने ही कारवाई केली. काही लोक ११ जनावरे एका टेम्पोतून घेऊन निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी गौडगाव येथे सापळा लावला. या कारवाईत वाहन आणि जनावरे जप्त केली. याबाबत अमित घाडगे यांनी फिर्याद दिली. पकडलेल्या या गायी गायी बार्शी येथील गोशाळेत पाठवण्यात आल्या असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करत आहेत.

Web Title: 11 animals taken for slaughter were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.