सोलापूर जिल्ह्यातील उळे ग्रामपंचायतीत ११ लाखांचा गैरव्यवहार, बनावट सह्या करून हडपले पैसे, सरपंचासह मुलावर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:50 AM2018-01-12T11:50:08+5:302018-01-12T11:53:29+5:30

ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून १० लाख ६२ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी खंडागळे, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर खंडागळे आणि अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

11 lakhs of mischief in Ule Grampanchayat in Solapur district, fake money by handling fake currency, sarpanch with child cheating | सोलापूर जिल्ह्यातील उळे ग्रामपंचायतीत ११ लाखांचा गैरव्यवहार, बनावट सह्या करून हडपले पैसे, सरपंचासह मुलावर फसवणुकीचा गुन्हा

सोलापूर जिल्ह्यातील उळे ग्रामपंचायतीत ११ लाखांचा गैरव्यवहार, बनावट सह्या करून हडपले पैसे, सरपंचासह मुलावर फसवणुकीचा गुन्हा

Next
ठळक मुद्दे ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून हा गैरव्यवहार करण्यात आला उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी रामचंद्र खंडागळे यांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरवले गैरव्यवहारात संगनमताने रक्कम काढल्याचा संशय


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून १० लाख ६२ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी खंडागळे, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर खंडागळे आणि अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून हा गैरव्यवहार करण्यात आला आहे़ 
उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी रामचंद्र खंडागळे यांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरवले असून त्यांच्या अपात्रतेला स्थगिती मिळाली आहे़ सरपंच खंडागळे यांचा मुलगा ज्ञानेश्वर याने ग्रामसेवकाकडील चेकबुक स्वत:कडे घेतले़ त्यावर रकमा टाकून ग्रामसेवकाच्या बनावट सह्या के ल्या आणि चार चेकच्या सहायाने १० लाख ६२ हजार रक्कम हडप केली, अशी तक्रार ग्रामसेवक बी़ सी़ चौगुले (तळेहिप्परगे) यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे़ पो़ नि़ किशोर नावंदे यांनी बँकेत या खात्याची खातरजमा करून सरपंच पद्मिनी खंडागळे, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर खंडागळे यांच्यावर भा़दं़विी ४०९, ४२०, ४६७, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ 
ज्ञानेश्वर खंडागळे याने ग्रामपंचायतीचे चेकबुक स्वत:कडे ठेवले़ ग्रामसेवकाने मागणी करूनही दिले नाही़ अखेर २९ डिसेंबरच्या मासिक सभेत चेकबुक मागणीचा ठराव करण्यात आला़ संशय आल्याने बँक आॅफ इंडियाच्या बाळीवेस शाखेत जाऊन खातेउतारा पाहिला असता हा प्रकार उघडकीस आला़ त्यात अरकल ब्रदर्स १ लाख ३० हजार, श्रीहरी केशव हंचाटे २ लाख ५० हजार, सीटीएस क्लिअरिंग ३ लाख १७ हजार, व्यंकटेश एस़ अरकल ३ लाख ६५ हजार असे चार चेक ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून वटवले़ विशेष म्हणजे ज्यांच्या नावे चेक वटवण्यात आले त्या एजन्सीनी कामे केली नाहीत़ कामाचे मूल्यांकन नाही़ गटविकास अधिकाºयाची मान्यता नाही़ बँकेने चेक वटवताना स्वाक्षरीची पडताळणी केली नाही़ त्यामुळे या गैरव्यवहारात संगनमताने रक्कम काढल्याचा संशय आहे़
--------------------
उळे ग्रामपंचायत अपहारप्रकरणी ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून रक्कम लाटणाºया सरपंच, त्यांचा मुलगा, रकमा हडपणाºया एजन्सीज आणि सहआरोपी यांना तातडीने अटक करून चौकशी केली पाहिजे; अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडावे लागेल़ 
- नागसेन कांबळे, तालुकाध्यक्ष, 
ग्रामसेवक संघटना, दक्षिण सोलापूर 
---------------------
सरपंच पद्मिनी खंडागळे यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा ग्रामपंचायतीच्या कारभारात सतत हस्तक्षेप करीत असे़ त्याच्याकडील चेकबुकची वारंवार मागणी करूनही त्याने दिले नाही़ त्यामुळे संशय बळावला़ त्याला गैरव्यवहार करण्यासाठी अन्य दोघांनी मदत केली़ 
- बी़ सी़ चौगुले,
ग्रामसेवक, उळे ग्रामपंचायत 

Web Title: 11 lakhs of mischief in Ule Grampanchayat in Solapur district, fake money by handling fake currency, sarpanch with child cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.