भोसे ग्रामपंचायतीत ११ सदस्य बिनविरोध; ६ जागांसाठी लागली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:52+5:302021-01-08T05:09:52+5:30

स्व. राजूबापू पाटील यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांचे कोरोनामुळे तर अनेक ज्येष्ठ व्यक्ती, तरुणांचे याच काळात निधन झाले होते. याचबरोबर ...

11 members in Bhose Gram Panchayat unopposed; Election started for 6 seats | भोसे ग्रामपंचायतीत ११ सदस्य बिनविरोध; ६ जागांसाठी लागली निवडणूक

भोसे ग्रामपंचायतीत ११ सदस्य बिनविरोध; ६ जागांसाठी लागली निवडणूक

Next

स्व. राजूबापू पाटील यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांचे कोरोनामुळे तर अनेक ज्येष्ठ व्यक्ती, तरुणांचे याच काळात निधन झाले होते. याचबरोबर खासदार संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भोसे परिवर्तन पॅनलने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असाही मतप्रवाह बहुतांशी ग्रामस्थांनी उघडपणे बोलून दाखवला; परंतु सत्ताधारी पाटील विरोधी कांचन बाळू कोरके यांनी तीन प्रभागातून, बाळू बाबुराव कोरके यांनी दोन प्रभागातून, तर जीवन तळेकर व सारिका माळी यांनी आपापले निवडणूक अर्ज कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक लागली आहे.

बिनविरोध निवडून आलेले सदस्य

प्रभाग १ : स्नेहा रोहिदास अडगळे, ज्योती विलास शिंदे, प्रभाग २ : वनिता विलास नाईकनवरे, संतोष नामदेव घोडके, कौशल्या वसंत टरले, प्रभाग ४ : शिवगंगा शेखर कोरके, संध्या दत्तात्रय माळी, प्रभाग ५ : मेघा अविनाश थिटे, सदाशिव पांडुरंग गावडे, प्रभाग ६ : विमल भारत गावडे, अविंदा पांडुरंग मस्के आदी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Web Title: 11 members in Bhose Gram Panchayat unopposed; Election started for 6 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.