चोरीस गेलेल्या ११ दुचाकी जप्त, दोघे जेरबंद, सोलापूर शहर पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:45 PM2017-11-06T15:45:12+5:302017-11-06T15:46:22+5:30

शहर व ग्रामीण भागातुन दुचाकी चोरणाºया दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अकरा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

11 robberies stolen, both arrested and injured, Solapur city police action | चोरीस गेलेल्या ११ दुचाकी जप्त, दोघे जेरबंद, सोलापूर शहर पोलीसांची कारवाई

चोरीस गेलेल्या ११ दुचाकी जप्त, दोघे जेरबंद, सोलापूर शहर पोलीसांची कारवाई

Next
ठळक मुद्देमौजमजा व चैनीसाठी ते दोघे दुचाकी चोरत असल्याचे तपासात निश्चपन्नदोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले



आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : शहर व ग्रामीण भागातुन दुचाकी चोरणाºया दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अकरा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
सोमनाथ शिवाजी राठोड (वय २२,रा.खडके वस्ती,ता.मोहोळ), रमेश दशरथ जाधव (वय १९,रा. देवमाळ मस्ती.ता.मोहोळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित माने व त्याच्या पथकाला दोन इसम हे हरिभाई देवकरण प्रशालेच्या बाजूस थांबले असल्याची माहिती मिळाली होती. ते दोघे पोलीस निरीक्षक माने यांने बघताच पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शहर व जिल्ह्यातून अकरा दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्या दोघासमवेत इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अकरा दुचाकी जप्त केल्या. त्याची किमत ३ लाख रुपये आहे. मौजमजा व चैनीसाठी ते दोघे दुचाकी चोरत असल्याचे तपासात निश्चपन्न झाले आहे.
पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि रणजित माने, पोलीस हवालदार जयंत चवरे, दिपक राऊत,विनायक बर्डे, सागर सरतापे, सचिन होटकर, सुहास अर्जुन, संजय काकडे, विजय निंबाळकर आदींनी ही कामगिरी केली.

Web Title: 11 robberies stolen, both arrested and injured, Solapur city police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.