शिक्षकांनी स्वखर्चातून सजवल्या ११ शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:30+5:302021-08-22T04:26:30+5:30
झेडपी सीईओंच्या शाळा सौंदर्यीकरण मोहीम अंतर्गत बार्शी तालुक्यातील देवगाव केंद्र आघाडीवर आहे. केंद्र प्रमुख धनाजी जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ...
झेडपी सीईओंच्या शाळा सौंदर्यीकरण मोहीम अंतर्गत बार्शी तालुक्यातील देवगाव केंद्र आघाडीवर आहे. केंद्र प्रमुख धनाजी जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व ११ शाळांकडे जाण्यासाठी मनरेगातून रस्ते, शोषखड्डे ,शौचालय , शाळा रंगरंगोटीसह भौतिक सुविधा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय तंबाखू मुक्त, माता पालक संघ, शिक्षक पालन समिती, माजी विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन अंतर्गत सजावट आदी कामे केली आहेत. प्रत्येक शिक्षकांनी देखील यासाठी आर्थिक योगदान दिले.
गटशिक्षणाधिकारी साधना काकडे, विस्तार अधिकारी व लक्ष्मीकांत जाधव, केंद्र प्रमुख धनाजी जाधवर यांनी ही कामे करून घेतली.
कोरोना महामारी पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद आहेत. गतवर्षी झालेली अतिवृष्टी व दीर्घकाळ बंद असलेल्या शाळा यामुळे शाळा इमारतींची डागडुजी व रंगरंगोटी ही कामे करणे खूप गरजेचे होते. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांना शाळा सौंदर्यीकरण याबाबत आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील सर्व शिक्षक जोमाने कामाला लागले. सुटीच्या दिवशी देखील खंड पडला नाही. त्याचीच परिणीती म्हणून केंद्रातील सर्व शाळांतून शाळा सुशोभित होऊन सुसज्ज झाल्या आहेत.या कार्यपूर्तीनिमित्त जाधवर यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचा स्वखर्चाने सत्कार केला. या प्रेरणादायी कौतुकामुळे भविष्यातही सर्व शिक्षक अधिक जोमाने कार्यरत राहतील, असे मुख्याध्यापक अ. सी. सौदागर म्हणाले.
----२१बार्शी-कांदलगाव
शिक्षकांच्या योगदानातून सजवलेली कांदलगाव शाळेचा परिसर.
210821\img_20210808_180215.jpg
कांदलगाव जिल्हा परिषद शाळा