११९ शाळांना एल.सी.डी., २५१ शाळांना संगणक

By admin | Published: June 23, 2014 01:02 AM2014-06-23T01:02:57+5:302014-06-23T01:02:57+5:30

जिल्हा परिषद: सेसमधून सव्वा कोटीची केली खरेदी

11 schools for LCDs, 251 schools to computers | ११९ शाळांना एल.सी.डी., २५१ शाळांना संगणक

११९ शाळांना एल.सी.डी., २५१ शाळांना संगणक

Next


सोलापूर: जिल्ह्यातील ११९ जिल्हा परिषद शाळांना एल.सी.डी. प्रोजेक्टर दिले तर २५१ शाळांसाठी संगणक मंजूर झाले आहेत. ते शाळांमध्ये बसविले जात असल्याचे शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सेसमधून सव्वा कोटीची रक्कम खर्च करुन ही खरेदी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. एल.सी.डी. प्रोजेक्टर मंजूर झालेल्या प्राथमिक शाळा- बोचरे वस्ती (करकंब), रानमळा, तुंगत, भंडीशेगाव, भाळवणी मुली, गादेगाव, मठ वस्ती कासेगाव, फुलचिंचोली, कासेगाव-२, ईश्वरवठार, शेंडगे वस्ती, सांगवी, करोळे (पंढरपूर), मार्डी, कवठे, बेलाटी, बीबीदारफळ- १ (उत्तर सोलापूर), पानगाव मुली, विद्यानगर वैराग, काळेगाव, उपळे मुले, चारे, पिंपळगाव धस, पांगरी मुले, उमरगे, खांडवी मुली, लोखंडे वस्ती, जावीर वस्ती, पाटखळ, माचणूर, गोणेवाडी, लोणार वस्ती निंबोणी, फटेवाडी, डोणज, मरवडे मुले, मरवडे मुली, भाळवणी, शिवडगाव, येड्राव, बोराळे मुली, हाजापूर, अरळी, रेवेवाडी, हुलजंती, आसबेवाडी (मंगळवेढा), लऊळ, परिते, अंजनगाव खे., भोसरे, वडोली, चव्हाणवाडी, कुर्डू मुली, निमगाव टें., उजनी मा., उपळाई खु., कव्हे, बेंबळे, तुळशी (माढा), गव्हाणे वस्ती, कुरनूर, वागदरी मुले, इब्राहिमपूर कन्नड, कडबगाव मराठी, हालचिंचोली, मुंढेवाडी कन्नड, दुधनी मराठी (अक्कलकोट), आढेगाव, पेनूर नं-२, पोखरापूर, भांबेवाडी, कुरुल, पीरटाकळी, कोरवली, वाफळे, कुरुल उजनी वसाहत, परमेश्वर पिंपरी, कुरणवाडी, आष्टी (मोहोळ), उदनवाडी, कोळा, नाझरे, चिकमहुद, जवळा, अकोला, वाढेगाव, सोमेवाडी, हात्तीद, वाटंबरे (सांगोला), पिलीव मुले, वेळापूर मुले, यशवंतनगर, अकलूज मुले, बोरगाव, महाळुंग, कन्या माळशिरस, सदाशिवनगर, कन्या नातेपुते, फोंडशिरस, घुले वस्ती पानीव (माळशिरस), सावडी, कुंभेज, जातेगाव, पांडे, कविटगाव, वांगी-१, पोथरे, घाटी, दिवेगव्हाण, राजुरी (करमाळा), माळकवठे, मंद्रुप मुले, वळसंग मराठी, कासेगाव, निंबर्गी, होटगी मराठी, दिंडूर, कंदलगाव मुले, दर्गनहळ्ळी, होटगी (भीमानगर) (दक्षिण सोलापूर).
-----------------------------
तालुकानिहाय संगणकाची संख्या
जिल्ह्यातील जि.प.च्या २५१ प्राथमिक शाळांना संगणक मंजूर करण्यात आले आहेत. पंढरपूर तालुक्याला २९, उत्तर तालुक्याला ९, बार्शी तालुक्याला २३, मंगळवेढा तालुक्याला १७, मोहोळ तालुक्याला २५, अक्कलकोट तालुक्याला २३, सांगोला तालुक्याला २३, माळशिरस तालुक्याला ३६, करमाळा तालुक्याला २२, दक्षिण सोलापूर तालुक्याला १९, माढा तालुक्याला २५ संगणक दिले आहेत.

Web Title: 11 schools for LCDs, 251 schools to computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.