आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज

By शीतलकुमार कांबळे | Published: June 6, 2023 03:13 PM2023-06-06T15:13:54+5:302023-06-06T15:14:26+5:30

२६ जून रोजी प्रथम गुणवत्ता यादी

11th admission process starts from June 8; Apply by June 20 in solapur | आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज

आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज

googlenewsNext

सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेस गुरुवार आठ जून पासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना आठ ते २० जून पर्यंत संबंधित महाविद्यालयांकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी दिली.

21 ते 24 जून पर्यंत महाविद्यालयात प्राप्त अर्जांची छाननी करणार आहेत. 26 जून रोजी प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांना 26 जून पासून १ जुलै पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. दुसरी गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना 3 जुलै ते सात जुलै पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. 

जागा रिक्त असल्यास आठ जुलै रोजी महाविद्यालये तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करतील. या यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना तीन ते आठ जुलै ते १३ जुलै दरम्यान प्रवेश घ्यावा लागणार आहे. १३ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया बंद होणार असून १७ जुलै रोजी अकरावीचे नियमित वर्ग सुरू होतील.

Web Title: 11th admission process starts from June 8; Apply by June 20 in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.