सोलापूरच्या रेल्वे कॉलनीमधील जुगार अड्ड्यावर धाड, १२ जण अटकेत, ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:57 PM2017-12-25T12:57:25+5:302017-12-25T13:01:10+5:30

रेल्वे स्टेशनजवळील विकास बारच्या जवळील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकून १२ जणांना अटक केली.

12 people arrested in a gambling lease in the railway colony of Solapur, and 12 thousand worth of money were seized | सोलापूरच्या रेल्वे कॉलनीमधील जुगार अड्ड्यावर धाड, १२ जण अटकेत, ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूरच्या रेल्वे कॉलनीमधील जुगार अड्ड्यावर धाड, १२ जण अटकेत, ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देया धाडीत आरोपींकडून ५७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाअवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाडमुंबई जुगार अ‍ॅक्ट कलम ४ व ५ अन्वये सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५  : रेल्वे स्टेशनजवळील विकास बारच्या जवळील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकून १२ जणांना अटक केली. या धाडीत आरोपींकडून ५७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बंद रेल्वे क्वॉर्टरमध्ये अंदर बाहर नावाचा जुगार सुरू असल्याची खबर डीबी पथकातील पोलीस नाईक सिद्राम नाईक यास मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक एन. जी. अंकुशकर यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार डीबी पथकासमवेत मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळ गाठले. विकास बारच्या समोर वाहने पार्क करुन रेल्वे क्वॉर्टर गाठले असता बंद खोलीत आतून आवाज ऐकू आला. दरवाजा ढकलून सर्व आत गेले असता गोलाकार बसून पत्त्याचा जुगार सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. 
पथकाने सर्वांची नाकेबंदी करुन १२ जणांना ताब्यात घेतले. प्रत्येकांनी  जुगारासाठी वापरलेला एकूण ५७ हजार ६० रुपये मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या आरोपींमध्ये मोहमद अतीक शेख (वय ३३, १०६, रेल्वे लाईन्स,सोलापूर), विनायक अनंतराव राक्षे (वय ३०, फुरडे कॉम्प्लेक्स, दमाणीनगर, सोलापूर), मल्लिनाथ भास्कर (वय ५८, उत्तर कसबा), शिवानंद इरण्णा बिराजदार (वय मल्लिकार्जुन नगर,सोलापूर), विनोद रामचंद्र राठोड(वय २९, रा. वडजी), सुमित अमोगसिद्ध शेंडगे (वय २२, रा. लोभाजी मास्तर चाळ), बसवराज लक्ष्मण केमशेट्टी (वय ४३, रा. तडवळ, अक्कलकोट), व्यंकटेश चिट्टर (वय ४३, रा. देगावनाका, लक्ष्मी पेठ), सादिक शब्बीर सय्यद ( नई जिंदगी), जाकीर बाबुलाल शेख (वय ४६, नई जिंदगी, सोलापूर), जावेद रुकमोद्दीन सिद्धकी (वय  २८, रा. पाच्छा पेठ, सोलापूर), सलीम बागवान- मुजावर (साखर पेठ, सोलापूर) यांचा समावेश आहे. 
सर्व आरोपींविरुद्ध मुंबई जुगार अ‍ॅक्ट कलम ४ व ५ अन्वये सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

Web Title: 12 people arrested in a gambling lease in the railway colony of Solapur, and 12 thousand worth of money were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.