१२,४२७ तपासण्यांमध्ये आढळले १२,३१२ जण निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:01+5:302021-06-06T04:17:01+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगोला तालुक्यातील ज्या गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले अशा २० गावांत इतर गावांपेक्षा रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगोला तालुक्यातील ज्या गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले अशा २० गावांत इतर गावांपेक्षा रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. या गावात ‘त्रिसूत्री’ कार्यक्रमासाठी सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक-सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, पंचायत समिती विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली वाॅर्डनिहाय भाग करून पथके तयार केली. या पथकांच्या मदतीसाठी इतर गावांतील आरोग्य सेवक, सेविकांचे आदेश काढून नियुक्त्या दिल्या आहेत. या उपक्रमाचे आ. शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कौतुक केले.
पंचवीस गावे झाली कोरोनामुक्त
सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी, अचकदाणी, बलवडी, बंडगरवाडी, भोपसेवाडी, बुरलेवाडी, डिकसळ, गायगव्हाण, गोडसेवाडी, गुणापवाडी, हबिसेवाडी, इटकी, नराळे, नरळेवाडी, जुजारपूर, केदारवाडी, मानेगाव, मेटकरवाडी, राजापूर, शिवणे, सोमेवाडी, तरंगेवाडी, तिप्पेहळ्ळी, वझरे व वाणीचिंचाळे ही २५ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
कोट ::::::::::::
सांगोला तालुक्यातील लोटेवाडी, कडलास, महूद, चोपडी, चिणके, मेडशिंगी, चिकमहूद, वाटंबरे, खिलारवाडी, जवळा, धायटी, आलेगाव, वाकी-शिवणे, शिरभावी, अजनाळे, एखतपूर, वाकी-घेरडी, सोनंद, अकोला, मांजरी या २० गावांत कोरोनाबाधितांची संख्या इतर गावांपेक्षा सर्वांत जास्त होती. त्यामुळे या गावात कोरोना चाचणी त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचा मुख्य उद्देश होता, तो यशस्वी होताना दिसत आहे.
- संतोष राऊत
गटविकास अधिकारी, सांगोला