सोलापुरातील १२६ जणांचा अहवाल प्राप्त; दोघांचा मृत्यू तर पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:16 AM2020-05-20T09:16:19+5:302020-05-20T09:17:21+5:30
सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या थांबता थांबेना; १६५ जणांनी केली कोरोनावर मात
सोलापूर : सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या १२६ जणांच्या अहवालानुसार पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जगभरात थैमान घातलेल्या 'कोरोना' या विषाणुजन्य आजाराने सोलापुरातही चांगलेच पाय पसरायला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी १२६ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, एक पुरुष व एक स्त्री असा दोघांचा मृत्यू झाला. सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आता ४६१ वर पोहचली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत ४४७८ जणांची चाचणी करण्यात आली यात ४२७० त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून १६५ जणांनी 'कोरोना' वर मात केली आहे.
सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या थांबता थांबेना; १६५ जणांनी केली कोरोनावर मात