शर्यत लावल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा; अटक करून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:03+5:302021-06-27T04:16:03+5:30
पोलीस सूत्रांनुसार आरोपी रफिक पटेल, इस्माईल पटेल, गुरणा आलुरे, भीमाशंकर गुंटे, शरण नवटाके, राजशेखर पाटील, राजशेखर पाटील, लक्ष्मण कोळी, ...
पोलीस सूत्रांनुसार आरोपी रफिक पटेल, इस्माईल पटेल, गुरणा आलुरे, भीमाशंकर गुंटे, शरण नवटाके, राजशेखर पाटील, राजशेखर पाटील, लक्ष्मण कोळी, उमेश सलगरे, प्रवीण खेड, बसवराज शहाणे, नागराज शटगार, गुरणा होटगी (सर्व रा. सलगर), सागर झळके (रा. भोसगे) यांच्यावर गुन्हा नोंदला आहे.
२५ जून रोजी कारहूणवी असल्याने सकाळपासून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी हनुमान मंदिराजवळ बैल पळवत असतात म्हणून तेथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, त्यांना चकवा देत शेतकऱ्यांनी जागा बदलून जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात बैल पळवले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर १३ जणांची ओळख पटवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सर्वांना अटक करून जामिनावर सोडून देण्यात आले.
याबाबत पोलीस अंबादास दूधभाते यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस नाईक प्रवीण शेळके करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना विनापरवाना हे कृत्य केल्याने कारवाई केल्याचे सांगण्यात आले.